कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू

चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून वैष्णवी पाटील यांच्यासह अन्य तिघे जखमी झाले आहेत. पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी पाटील या बेंगळुरूहून कोल्हापूरकडे परतत असताना आज पहाटे त्यांची इनोव्हा कार एका लॉरीला धडकली. धडक इतकी तीव्र होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात कारमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उर्वरित जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वाहनांच्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

या अपघातामुळे कोल्हापूर पोलीस दलासह अँटी करप्शन ब्युरोमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही घटनेची अधिक चौकशी केली जात आहे.
Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने