'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव


इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या वन-डे सामन्यात ४१ धावांनी पराभव करत मालिका आपल्या नावे केली आहे. न्यूझीलंड संघाने अखेरचे दोन्ही वनडे सामने जिंकत मालिका १-२ च्या फरकाने जिंकली आहे. न्यूझीलंड संघाने भारतात भारताविरूद्ध पहिला वन-डे मालिका विजय नोंदवला आहे. भारताच्या सिनियर संघासमोर न्यूझीलंडच्या ब संघाने उतरत दणदणीत मालिका विजय मिळवला आहे. यासह भारतासाठी हा मालिका पराभव जखम अधिक खोल करणारा आहे. न्यूझीलंडने दिलेल्या ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खूपच खराब झाली. रोहित शर्मा ११ धावा तर शुभमन गिल २३ धावा करत बाद झाले. दरम्यान रोहित शर्मा ११ धावांवर बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला उतरला. सुरूवातीला गिल मैदानावर असेपर्यंत विराटने काही आक्रमक फटके खेळत झटपट धावा केल्या. तसेच श्रेयस अय्यर ३ धावा तर के.एल राहुलही १ धाव करत बाद झाला.दरम्यान विराट कोहलीचे शतक आणि हर्षित राणा व नितीश कुमार रेड्डी यांची अर्धशतकं व्यर्थ ठरली.


भारताने नाणेफेक जिंकत न्यूझीलंड संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंड संघाकडून डॅरिल मिचेल व ग्लेन फिलिप्स यांनी शतकं झळकावलीव संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने हेन्री निकोल्सला शून्यावर बाद केले. तसेच दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेवॉन कॉनवेला हर्षित राणाने ५ धावांवर माघारी धाडले. पण नंतर डॅरिल मिशेल आणि विल यंग यांनी डाव सावरताना ५३ धावांची भागीदारी केली. पण खेळपट्टीवर स्थिरावलेल्या विल यंगला ४१ चेंडूंत ३० धावांवर असताना १३ व्या षटकात हर्षित राणाने बाद केले. त्याचा अफलातून झेल रवींद्र जडेजाने घेतला.


मात्र यानंतर मिशेलने ग्लेन फिलिप्सला साथीला घेतले. या दोघांनी खराब चेंडूंचा समाचार घेत पाहाता पाहाता द्वीशतकी भागीदारी केली. या दोघांनीही शतके साजरी केली. मिशेलन ३६ व्या षटकात १०६ चेंडूंत त्याचे शतक झळकावले. हे त्याचे नववे वनडे शतक आहे, तर भारताविरुद्धचे चौथे शतक आहे. याशिवाय चालू मालिकेतील सलग दुसरे शतक आहे. त्याच्यापाठोपाठ ४२ व्या षटकात फिलिप्सनेही ८३ चेंडूंत शतक केले. पण शतकानंतर अखेर फिलिप्सला ४४ व्या षटकात अर्शदीप सिंगने बाद केले. त्याचा झेल यष्टीरक्षक के. एल राहुलने घेतला. त्याने ८८ चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांसह १०६ धावांची खेळी केली. तो बाद झाल्याने त्याची मिशेल सोबतची २१९ धावांची भागीदारी तोडली. तो बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. ४५ व्या षटकात मिशेलला मोहम्मद सिराजने बाद केल. मिशेलने १३१ चेंडूंत १५ चौकार आणि ३ षटकारांसह १३७ धावा केल्या. त्यानंतर मिचेल हे यालाही कुलदीप यादवने २ धावांवर पायचीत केले. तर झाकरी फोक्सने ८ चेंडूंत १० धावा केल्या.


४९ व्या षटकात ख्रिनस्टन क्लार्कही ११ धावांवर हर्षित राण्याच्या गोलंदाजीवर त्रिफळाची झाला. पण मायकल ब्रेसवेलने शेवटच्या दोन षटकात आक्रमक खेळताना १८ चेंडूंत नाबाद २८ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडने ५० षटकात ८ बाद ३३७ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून