किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील निर्णायक तिसरा सामना खेळवला जात होता. या सामन्यात न्यूझीलंडने ३३७ धावांचा टप्पा पार करत भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी शतके केली.


या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. पण न्यूझीलंडने सलामीवीरांच्या विकेट्स झटपट गमावल्या. पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने हेन्री निकोल्सला शून्यावर बाद केले. तसेच दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेवॉन कॉनवेला हर्षित राणाने ५ धावांवर माघारी धाडले. पण नंतर डॅरिल मिशेल आणि विल यंग यांनी डाव सावरताना ५३ धावांची भागीदारी केली. पण खेळपट्टीवर स्थिरावलेल्या विल यंगला ४१ चेंडूत ३० धावांवर असताना १३ व्या षटकात हर्षित राणाने बाद केले. त्याचा अफलातून झेल रवींद्र जडेजाने घेतला.


मात्र यानंतर मिशेलने ग्लेन फिलिप्सला साथीला घेतले. या दोघांनी खराब चेंडूंचा समाचार घेत पाहाता पाहाता द्वीशतकी भागीदारी केली. या दोघांनीही शतके साजरी केली. मिशेलन ३६ व्या षटकात १०६ चेंडूत त्याचे शतक झळकावले. हे त्याचे नववे वनडे शतक आहे, तर भारताविरूद्धचे चौथे शतक आहे. याशिवाय चालू मालिकेतील सलग दुसरे शतक आहे. त्याच्यापाठोपाठ ४२ व्या षटकात फिलिप्सनेही ८३ चेंडूत शतक केले. पण शतकानंतर अखेर फिलिप्सला ४४ व्या षटकात अर्शदीप सिंगने बाद केले. त्याचा झेल यष्टीरक्षक के.एल राहुलने घेतला. त्याने ८८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह १०६ धावांची खेळी केली. तो बाद झाल्याने त्याची मिशेल सोबतची २१९ धावांची भागीदारी तोडली. तो बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. ४५ व्या षटकात मिशेलला मोहम्मद सिराजने बाद केल. मिशेलने १३१ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह १३७ धावा केल्या. त्यानंतर मिचेल हे यालाही कुलदीप यादवने २ धावांवर पायचीत केले. तर झाकरी फोक्सने ८ चेंडूत १० धावा केल्या.


४९ व्या षटकात ख्रिनस्टन क्लार्कही ११ धावांवर हर्षित राण्याच्या गोलंदाजीवर त्रिफळाची झाला. पण मायकल ब्रेसवेलने शेवटच्या दोन षटकात आक्रमक खेळताना १८ चेंडूत नाबाद २८ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडने ५० षटकात ८ बाद ३३७ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा करत भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य पार करावे लागणार होते.

Comments
Add Comment

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन