गमन : जीवनाला कलाटणी देणारे स्थलांतर

मुंबई :  स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो, पण हा केवळ एक अनुभव नसून त्यावेळी जीवनाला एक कलाटणी मिळते आणि त्याचे बरे वाईट परिणाम भोगत आपण एका स्थित्यांतरात पोहोचतो. ‘गमन’ हा चित्रपट याच विषयावर भाष्य करतो. मनोज नाईकसाटम लिखित 'कोकण मराठी परिषदेचा पुरस्कार' प्राप्त ‘अपरांत’ कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. तसेच चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन मनोज नाईकसाटम यांचेच आहे. याआधी त्यांनी गौराई, वारसा, सेलिब्रेशन असे आशयबद्ध लघुपटही दिग्दर्शित केले आहेत, जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवांमध्ये प्रदर्शित होऊन त्यांना अनेक पुरस्कारही लाभले आहेत.

गमनचा अपरांत कादंबरीपासून सुरु झालेला प्रवास आता थेट चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर झळकण्याकरिता तयार आहे. सिनेमाविषयी आवड आणि जिद्दीच्या जोरावर मनोज नाईकसाटम यांनी हा पल्ला गाठला आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते 'नारायण जाधव' आणि 'भेरा’ चित्रपटातील अभिनयाकरिता २०२४ सालचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभलेल्या अभिनेत्री ‘श्रद्धा खानोलकर’ मुख्य भूमिका साकारत आहेत.

उत्तर प्रदेश ते मुंबई आणि मुंबई ते कोकण असा मोठा परीघ या सिनेमाला लाभला आहे. कोकणातील एका खेडे गावात राहणारं एक वृद्ध जोडपं जुजबी उपचाराकरिता मुंबईत स्थायिक असलेल्या आपल्या मुलांकडे आलेले असतात. मुलंही त्यांची उत्तम काळजी घेत असतात पण गावाच्या मोकळ्या वातावणात आयुष्य व्यथित केलेल्या तसेच गावाच्या घराबद्दल आणि शेती-वाडीबद्दल आस्था असलेल्या त्या दोघांचं मन मुंबईत रमत नाही. गणेशोत्सवासाठी हे वृद्ध जोडपं पुन्हा गावी जायला निघतं. मुलं आई-वडिलांना उतारवयात सोबतीला म्हणून उत्तर प्रदेशातील गरजू भाऊ आणि बहीण पाठवतात. पण नियतीने काही वेगळंच योजलेलं असतं.सिनेमा मुंबई आणि कोकण(मालवण) या दोन्ही ठिकाणी चित्रित झाला आहे.
Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’