महापालिकेच्या अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण होणार

स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आयुक्त मांडणार अर्थसंकल्प


मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा अर्थसंकल्प येत्या ३ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार असून प्रत्यक्षात महापालिकेची निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आले असले तरी स्थायी समिती अध्यक्षांची नेमणूक न झाल्यामुळे हा अर्थसंकल्प प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त डॉ.भूषण गगराणी हे नामधारी स्वीकारण्याची शक्यता आहे. हा अर्थसंकल्प नामधारी स्वीकारताना त्यातील विकासकामे तसेच योजना आदींची माहिती घोषित न करता बंद स्थितीत तो ठेवून दिला जाणार आहे. त्यामुळे त्यापुढील आठवड्यात स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर हा अर्थसंकल्प आयुक्त म्हणून गगराणी हे स्थायी समितीत मांडतील अशाप्रकारची माहिती मिळत आहे.


अशाप्रकारे अर्थसंकल्प मांडल्यास नियमानुसार अर्थसंकल्प मांडलाही जाईल आणि स्थायी समितीपुढेही अर्थसंकल्प सादर करण्याचे उद्धिष्ट साध्य होणार आहे.



मुंबई महापालिकेच्या आगामी सन २०२६-२७ करता अर्थसंकल्प येत्या फेब्रुवारी मांडला जाणार आहे. मात्र, हा अर्थसंकल्प यंदा कुणी कुणाला सादर केला जावा याकडे खलबत सुुर आहे. येत्या ३ फेब्रुवारी रोजी महापालिकेचा आगामी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.


मात्र, यंदा निवडणुका पार पडल्यामुळे आणि नगरसेवक निवडून आल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष हे अर्थसंकल्प स्वीकारतील अशाप्रकारची शक्यता होती; पंरतु महापौर आरक्षण विलंबाने पडल्याने तसेच स्थायी समिती अध्यक्षांची निवड न झाल्यामुळे मागील २०२३ पासून ज्याप्रमाणे प्रशासक हे महापौर व स्थायी समिती अध्यक्षांच्या भूमिकेत राहून अर्थसंकल्प स्वीकारत आहेत, त्याचप्रमाणे अधिनियमातील तरतुदीनुसार येत्या ४ फेब्रुवारी पूर्वी हा अर्थसंकल्प मांडला जाईल. आणि अर्थसंकल्प तात्पुरत्या स्वरुपात स्वीकारुन तो जशाचा तसा बंदिस्त ठेवेल आणि पुढील आठवड्यात स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर हा अर्थसंकल्प आयुक्त या नात्याने डॉ. भूषण गगराणी हे नवनिर्वाचित अध्यक्षांना सादर करतील. अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे.


नियमानुसार ४ फेब्रुवारीपूर्वी अर्थसंकल्प मांडला जाणे आवश्यक आहे. त्यानुसार तो स्वीकारला जाईल आणि हा अर्थसंकल्प जसाचा तसा ठेवून तो अध्यक्षांची निवड झाल्यानंतर सादर करून यावर साधक बाधक चर्चा करून याला मंजुरी घेतली जाईल असे बोलले जात आहे. अर्थात अधिनियमातील तरतुदींचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेणे प्रशासनावर बंधनकारक असेल, असेही बोलले जात आहे.

Comments

DEEPAK M CHIKORDE    January 22, 2026 10:32 PM

आयुक्त आपण महापालिकेत पदार्पण केल्या पासून मी रेग्युलर आपल्याशी संपर्क साधला आहे एकूण संख्या 70 पेक्षा अधिक माहिती कादगपत्रांच्या पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गाईड लाईन नुसार कोणत्याही अनधिकृत बांधकाम विषयावर सक्त कारवाई करण्यात यावी असे आदेश असून देखील आपल्या ईमेलवर आणि लेखी तक्रारी दाखल झाल्या आहेत तरी आपण मूग गिळून गप्प बसले आहात का किंवा इतर काही गिळंकृत केले आहे म्हणून कारवाई केली जात नाही आहे.

DEEPAK M CHIKORDE    January 22, 2026 10:17 PM

आयुक्ताकडे ते अधिकार घेतल्या पासून सर्व कागद पत्रांच्या पुराव्यानिशी एकूण 100 पेक्षा अधिक वेळा अनधिकृत बांधकामे केलेले हे सिद्ध झाले असून देखील कारवाई करण्यात येत नाही आहे FIR होऊन गेले 8 महिने झाले तरी आयुक्त पुढील कोणतीच कारवाई करण्यात येत नाही? कारण आयुक्त मूग कि आणखी काही गिळूण गप्प बसून राहिले आहेत ?

Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी