भाजपच्या खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वालकर बिनविरोध

ठाकरे सेनेला आणखी धक्का


उबाठा सेनेच्या खारेपाटण जि. प. च्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी घेतली माघार


कणकवली : तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे या मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार प्राची इस्वलकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.


या घडामोडींमुळे कणकवली तालुक्यात भाजपाकडून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या ३ झाली असून, कणकवली विधानसभा मतदारसंघात ही संख्या एकूण ४ पोहोचली आहे.


पालकमंत्री . नितेश राणे यांचे ‘दे धक्का तंत्र’ सध्या केवळ मतदार संघातच नव्हे, तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मीनल तळगावकर यांच्या माघारीच्या निर्णयामुळे ठाकरे सेनेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.


विशेष म्हणजे शनिवार असूनही निवडणूक प्रक्रियेमुळे निवडणूक कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत आणखी कोण उमेदवार माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कालच या मतदार संघातील अपक्ष उमेदवार उज्ज्वला चिके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर आज ठाकरे शिवसेनेच्या एकमेव विरोधी उमेदवार मीनल तळगावकर यांनीही माघार घेतल्याने प्राची इस्वलकर या या मतदार संघातील एकमेव उमेदवार राहिल्या. दरम्यान, ‘दे धक्का’ तंत्राचा मोठा फटका २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी बसण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण