पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ‘पंचम’ हा विशेष व्हॉट्सअॅप चॅटबॉट लाँच केला आहे. आता घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे आणि योजनांची माहिती मिळवणे शक्य होणार आहे.


केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ग्रामपंचायतींना सक्षम करण्याच्या उद्देशाने 'पंचम' हा चॅटबॉट आज लाँच केला आहे. ग्रामपंचायतींसाठी एक 'डिजिटल सोबती' म्हणून याची रचना करण्यात आली आहे. हा चॅटबॉट दैनंदिन प्रशासकीय कामात मदत करण्यासोबतच मार्गदर्शन आणि महत्त्वाची माहिती सुलभपणे पोहोचवण्याचे काम करेल. 'पंचम' केंद्र सरकार आणि देशभरातील ३० लाखांहून अधिक निवडून आलेले प्रतिनिधी व पंचायत पदाधिकारी यांच्यात थेट डिजिटल संपर्क साधणार आहे.


ग्रामीण भागात व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, ही बाब लक्षात घेऊनच ही सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी कोणतेही नवीन अॅप डाऊनलोड करण्याची किंवा शिकण्याची गरज नाही. एखाद्या व्यक्तीशी चॅटिंग करावे, इतक्या सोप्या पद्धतीने नागरिकांना माहिती मिळेल.


'पंचम' ई-ग्राम स्वराजशी संबंधित लाइव्ह डेटा, पंचायत अधिकारी आणि निवडून आलेल्या सदस्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करतो. हा चॅटबॉट ई-ग्राम स्वराज, एलजीडी, जीपीडीपी आणि मंत्रालयाच्या प्रमुख योजना व उपक्रमांशी संबंधित माहिती देईल. सध्या हा चॅटबॉट एआय आधारित चॅटबॉट्ससारखा काम न करता, आधीच फीड केलेल्या निश्चित माहितीच्या आधारे उत्तरे देईल. ही माहिती सतत अपडेट केली जाईल. सामान्य नागरिक विविध दाखले, प्रमाणपत्रे, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या सरकारी कामांची माहिती मिळवण्यासाठी पंचमचा वापर करू शकतील. ग्रामपंचायत सदस्यांना आणि अधिकाऱ्यांना योजना, सर्वेक्षणे, प्रशिक्षण साहित्य आणि अधिकृत मंत्रालयाच्या सूचना थेट उपलब्ध होतील.

Comments
Add Comment

Panama City : पनामात भूकंपाचा महाप्रलय! ७.७ तीव्रतेच्या धक्क्यानंतर अमेरिकेकडून ९ देशांना त्सुनामीचा हाय अलर्ट

मध्य अमेरिकेतील पनामा देशाच्या किनारपट्टीवर शुक्रवारी रात्री एक अत्यंत भयानक नैसर्गिक आपत्ती ओढवली. रिश्टर

Saharanpur Accident : सहारनपुरमध्ये काळाचा घाला! शाकुंभरी देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला कंटेनरची धडक; ४ जणांचा जागीच मृत्यू, १२ गंभीर जखमी

उत्तर प्रदेश : नवरात्रीच्या आनंदावर विरघळवणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशातील सहारनपुरमधून समोर आली

CISF Investigation : जम्मू-काश्मीरमध्ये CISF जवानाचा गोळी लागून मृत्यू; चौकशीचे आदेश, नेमकं कारण काय?

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानाचा गोळी लागून

Mumbai Crime Branch : बेकायदेशीर CDR, SDR अन् मोबाईल लोकेशन देणाऱ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; २ पोलिसांसह ५ जण गजाआड!

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने बेकायदेशीरपणे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स (CDR), सबस्क्रायबर डिटेल्स रेकॉर्ड्स (SDR) आणि मोबाईल

'सायबरटेक एशिया'चे पहिल्यांदाच भारतात आयोजन; जागतिक सायबर सुरक्षा परिषद कधी, कुठे असेल?

मुंबई: सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या ‘सायबरटेक एशिया’चे

Uttar Pradesh Viral Video : शाळकरी विद्यार्थ्याच्या डोक्यावर शिक्षकाने वाजवला 'तबला'; व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षकावर निलंबनाची कारवाई!

इटावा : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एका सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षकाच्या अजब आणि अशोभनीय वर्तनाचा प्रकार