बुलढाण्यात झेंडावंदन कार्यक्रमात मुख्याध्यापकांचा हृदयविकाराच्या झटक्यानी मृत्यू; गावात पसरली शोककळा

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात हृदय पिळवणारी घटना घडली आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिनी सगळीकडे उत्साहाचं वातावरण असताना या आनंदात मिठाचा खडा पडला. मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झेंडावंदन कार्यक्रम सुरू होता. त्या दरम्यान शाळेतील मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला . ही घटना झेंडावंदनाच्या कार्यक्रमादरम्यान घडल्यामुळे नागरिक, उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.


दिलीप राठोड हे शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारीनं काम करत होते. प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रध्वज फडकावण्याच्या क्षणीच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की तत्काळ उपचार मिळाले तरी वाचवणं शक्य झालं नाही. या घटनेनं संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षणवर्ग आणि ग्रामीण भागात शोकाची लाट पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर शोक व्यक्त केला आहे. प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय उत्सवात अशी दुर्दैवी घटना घडणं हे अत्यंत दुःखद आहे. दिलीप राठोड यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आठवण कायम राहील. त्यांच्या कुटुंबीयांना, सहकारी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना या अपरिहार्य नुकसानीचे सांत्वन करणे कठीण आहे. स्थानिक प्रशासनानं या घटनेची दखल घेऊन आवश्यक मदत आणि चौकशी करण्याची अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.


या घटनेमुळे हृदयविकाराच्या वाढत्या समस्येकडंही लक्ष वेधलं जात आहे. ह्या घटना विशेषतः तणावपूर्ण कामकाज आणि वयस्क व्यक्तींमध्ये आढळून येत आहे . आरोग्य तज्ज्ञांनी नियमित तपासणी आणि जीवनशैलीत बदल करण्याचं आवाहन केलं आहे.


अशाच दुसऱ्या एका घटनेत, धाराशिव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका उत्पादन शुल्क उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. अधिकारी म्हणाले की, मोहन जाधव (५६) हे उमरगा तालुक्यातील तळमोडे सीमा तपासणी नाक्यावर ध्वजारोहणानंतर कर्मचाऱ्यांच्या सामूहिक छायाचित्रासाठी उभे असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते कोसळले.


"जाधव यांना तातडीनं उमरगा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता. ते सोलापूरच्या प्रतापनगर भागातील रहिवासी होते," असं अधिकाऱ्यानं सांगितलं. एका प्रत्यक्षदर्शीनं मोबाईलवर चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये जाधव यांचा तोल जाऊन ते खाली पडताना दिसत आहेत, त्यानंतर त्यांचे सहकारी त्यांच्या मदतीसाठी धावले.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी