श्री मलंगगड यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

अप्पर आयुक्तांकडून सुरक्षेचा सखोल आढावा


कल्याण : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगड यात्रेला माघ पौर्णिमेनिमित्त सुरुवात होत आहे. या यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी सर्व यंत्रणांचा सखोल आढावा घेतला. यात्रेच्या पूर्वसंध्येला आयोजित बैठकीत पोलीस, महसूल, महावितरण, आरोग्य आणि वाहतूक विभागासह विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी व वंशपरंपरागत ट्रस्टी उपस्थित होते.
संपूर्ण यात्रा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असेल. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वात मोठा फौजफाटा हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तैनात करण्यात आला आहे. नेवाळी ते श्री मलंगगड मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळामार्फत जादा बस सोडण्यात येणार आहेत.


वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणला सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य विभाग, अग्निशमन दल आणि पाणीपुरवठा यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी गडाच्या पायथ्याशी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.


जया एकादशीच्या पहाटे वंशपरंपरागत पुजारी अॅड. विजय केतकर यांच्या निवासस्थानावरून पालखीचे प्रस्थान होईल. माघ पौर्णिमेच्या मुख्य दिवशी गडावर पालखी सोहळा पार पडणार असून, देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत चिकन शोरमामुळे विषबाधा; रुग्णसंख्या 116 वर, 107 जण रुग्णालयात

भिवंडीत रस्त्याच्या कडेला असलेल्या शोरमाच्या गाड्यावर चिकन शावरमा खाल्ल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांची

कल्याण- विठ्ठलवाडी- उल्हासनगरमध्ये वाहतूकीत बदल, विकासकामांमुळे अवजड वाहनांवर निर्बंध; तपशील पाहा

कल्याण: कल्याणकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्मशानभूमीजवळ असणाऱ्या खडेगोलवली

Bhiwandi News : धक्कादायक! शोरमा खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा; लहान मुलांचाही समावेश, रुग्णालयात उपचार सुरू

ठाणे : भिवंडी शहरात शोरमा खाल्ल्यानंतर 17 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. वंजारपट्टी नाका परिसरातील

Vasant Smruti Awards : वसंतस्मृती पुरस्कार सोहळ्यात 159 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा गौरव; रहेजा गार्डनमधील आगीवेळी बचावकार्य करणाऱ्या जवानांचाही सन्मान

ठाणे : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ठाण्यात आयोजित नवव्या वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार

CHM College: उल्हासनगरचा विकास आराखडा तयार होणार! सिंधी बांधवांना जमिनीचे पट्टे देण्याची प्रक्रिया लवकरच

ठाणे: उल्हासनगर येथे हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्डच्या चंदीबाई हिंमतमल मनसुखानी (सीएचएम)

Miraroad Crime: रात्री पार्टीसाठी बोलावलं अन्… काशीगावमधील धक्कादायक प्रकरण, चार आरोपींचा शोध सुरू

मीरा रोड येथील काशीगावमधून सामूहिक बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी एका मैत्रिणीने