Sunetra Pawar Live Updates : सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत मोठी घडामोडी समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर राज्याची आणि पक्षाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ वाजता लोकभवनात सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आपला नवा नेता निवडला असून, सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. आज पार पडलेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व आमदारांनी आणि नेत्यांनी सुनेत्रा वहिनींच्या नावावर संमती दर्शवली.



सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे रात्रीच मुंबईत दाखल झाले आहेत. आज होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी अधिकृत निवड केली आहे. अजित दादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनींकडे पक्षाची सर्व सूत्रे सोपवून कार्यकर्त्यांना आणि आमदारांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. राज्य विधिमंडळाच्या राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा अधिकृतपणे राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला.

Comments
Add Comment

ST Bus: एसटीच्या जमिनींतून उत्पन्नाचा ‘महामार्ग’, 98 वर्षांच्या भाडेपट्ट्याला मंजुरी

मुंबई: आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढवून एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महामंडळाच्या अतिरिक्त

Nana Patekar : महापालिका स्थायी समितीच्या सभेत नानांना नगरसेवकांनी वाहिली श्रध्दांजली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी गोव्यात ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Sewri Encroachment Removal : शिवडी परिसरातील पदपथांवरील ०७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते शेडवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

Ghatkopar STP Project : घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने मुंबई मलनि:सारण प्रकल्पांतर्गत

Municipal Hospitals Digital Payment : महानगरपालिका दवाखाने, आपला दवाखाना येथे डिजिटल पेमेंट सुविधा, अतिरिक्‍त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश

मुंबई विशेष प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील दवाखाने, नागरी आरोग्य केंद्र, हिंदुहृदयसम्राट

Vidyavihar Railway Station : विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी सज्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर