भारताची युवा विश्वचषक उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान नेट रन रेटच्या गणितामुळे स्पर्धेतून बाहेर

बुलावायो  : १९ वर्षाखालील विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जात आहे. सेमीफायनलच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा होता. पण हा सामना संपण्यापूर्वीच भारताने अंडर-१९ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. या सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे, तर भारताने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. नेट रन रेटच्या गणितामुळे भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले आहे.


सुपर सिक्स फेरीतील हा अखेरचा सामना होता. सुपर सिक्समधून दोन्ही गटातून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरी गाठणार होते. ए गटातून ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघांनी उपांत्य फेरी गाठली होती. ब गटातून उपांत्य फेरीतील तिकीट इंग्लंडने ८ गुणांसह पक्के केले होते. पण उपांत्य फेरीत ब गटातून आणखी एक संघ उपांत्य फेरीत पोहचणार होता. या जागेसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शर्यत होती.


सामन्यापूर्वी भारताचा सर्वात चांगला (३.३३) नेट रन रेट होता. भारताचे ६ गुण होते, तर पाकिस्तानचे १.४८ नेट रन रेटसह ४ गुण होते. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी विजय आणि नेट रन रेटचे गणित दोन्ही संघांसमोर होते. रविवारच्या  सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर २५३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला हे लक्ष्य ३३.३ षटकात पूर्ण करणे गरजेचेच होते किंवा किमन ३४.३ षटकापर्यंत जाऊन षटकारासह २५८ धावा करणे गरजेचे होते. भारताला काहीही करून पाकिस्तानला ३५ षटकांहून अधिक काळ फलंदाजी करायला लावायची होती.


अखेर ३५ षटकांपर्यंत पाकिस्तान ४ बाद १६८ धावांपर्यंतच पोहचू शकल्याने भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले. कारण यानंतर पाकिस्तानने विजय मिळवला आणि भारताप्रमाणे ६ गुणांपर्यंत जरी पोहचले, तरी भारताच्या नेट रन रेटला ते मागे टाकू शकणार नाहीत. त्यामुळे भारताचे बी गटातील पहिल्या दोन संघातील स्थान निश्चित झाले असून पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानही संपले आहे. या सामन्यात भारतीय संघ ४९.५ षटकात २५२ धावांवर सर्वबाद झाला होता. भारताकडून वेदांत त्रिवेदीने ९८ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. तसेच कनिष्क चौहान (३५), आरएस आंब्रिश (२९), वैभव सूर्यवंशी (३०), विहान मल्होत्रा (२१) यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर ३५ षटकापर्यंत पाकिस्तानकडून हामजा जहूरन ४२ आणि कर्णधार फरहान हुसैनने ३८ धावा केल्या होत्या. उस्मान खानने अर्धशतक केले होते.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून