तिरुवनंतपुरममध्ये किवींचा धुव्वा

भारताने मालिका विजयावर उमटवला शिक्का


तिरुवनंतपुरम : टी-२० वर्ल्डकपच्या रणधुमाळीपूर्वी भारतीय संघाने आपली तयारी पूर्ण केल्याचे संकेत दिले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवत मालिकेवर वर्चस्व गाजवले. तिरुवनंतपुरम येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ४६ धावांनी धुव्वा उडवला.


भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली होती. अभिषेकने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती.


मात्र सॅमसन तिसऱ्याच षटकात ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर अभिषेकही चांगल्या सुरुवातीनंतर ५ व्या षटकात बाद झाला. त्याने १६ चेंडूंतच ३० धावांची खेळी केली. दोघांनाही लॉकी फर्ग्युसनने बाद केले. या दोन विकेट्सनंतर मात्र इशान किशनचे वादळ न्यूझीलंडवर घोंगावले. त्याला कर्णधार सूर्यकुमार यादवची साथ मिळाली. इशान किशन अत्यंत आक्रमक खेळत होता. त्याने २८ चेंडूतच अर्धशतक केले. तसेच १२ व्या षटकांत इश सोधीविरुद्ध २९ धावाही चोपल्या. त्याच्यासोबत सूर्यकुमारही चांगला खेळत होता. त्यानेही २६ चेंडूंत अर्धशतक केले. पण अर्धशतकानंतर तो १५ व्या षटकात बाद झाला. त्याला मिचेल सँटेनरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक टीम सिफर्टने यष्टीचीत केले. सूर्यकुमारने ३० चेंडूंत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ६३ धावा केल्या. पण असे असले तरी इशान मात्र त्याच्या लयीत खेळत होता. त्याने ४२ चेंडूंत त्याचे शतक पूर्ण केले. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह यांने आपल्या ४ षटकांमध्ये पाच बळी घेतले.


न्यूझीलंडचा डाव २२५ धावांवर आटोपला
सलामीवीर टीम सेफर्ट स्वस्तात बाद झाला. सेफर्टला अवघ्या ५ धावांवर अर्शदीप सिंगने माघारी धाडले. त्यानंतर फिन अॅलनने आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. अॅलनने सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने केवळ २२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. अॅलन शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, मात्र अक्षर पटेलने त्याची झंझावाती खेळी थांबवली. अॅलनने ६ षटकार आणि ८ चौकारांसह ३० चेंडूंत ८० धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर कोणी मोठी कामगिरी केली नाही आणि संपूर्ण न्यूझीलंडचा संघ २२५ धावांवर मर्यादित राहिला आणि भारताने ४६ धावांनी हा सामना जिंकून मालिकेचा शेवट दिमाखात केला.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून