किश्तवाड जिल्ह्यातील मोबाईल, इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लपून बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाने मोहीम सुरू केली आहे. सुरक्षा कारवाईदरम्यान दशतवाद्यांना कोणताही गैरफायदा घेता येऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या क्षेत्रातील मोबाइल व इंटरनेट सेवा बंद केली आहे.


सुरक्षा दलाने शुक्रवारी राबवलेल्या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सिंहपोरा, चिंगम व चतर या भागातील सहा किमी क्षेत्रात मोबाइल व इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने १८ जानेवारी रोजी या क्षेत्रात मोहीम सुरू केली होती. त्यावेळी मंड्राल-सिंहपोराजवळील सोनार जंगलात दहशतवाद्यांसोबत उडालेल्या चकमकीत एक जवान शहीद, तर ७ जवान जखमी झाले होते. त्यानंतर २२ जानेवारीला माली डाना टॉप व २५ जानेवारी रोजी जनसीर-कांडीवार भागात पुन्हा दहशतवाद्यांशी चकमकी उडाल्या त्यावेळी दहशतवादी जंगलात पसार झाले होते.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि