‘जा-मर’ म्हणणे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे!

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल


कोची : दोन व्यक्तीच्या भांडणादरम्यान एकाने जा आणि मर यांसारखी विधाने करणे हे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे होत नाही. असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती सी. प्रदीप कुमार यांच्या एकलपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत संशयित आरोपविरोधात सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला.


या प्रकरणात याचिकाकर्ता एका विवाहितेसोबत नात्यात होता. मात्र त्याने दुसरीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. तरुणाने विवाहितेला "जा आणि मर" असे म्हटले. यानंतर त्या महिलेने तिच्या साडेपाच वर्षांच्या मुलीसह जीवन संपवले होते. सत्र न्यायालयाने या तरुणाचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ आणि कलम २०४ अंतर्गत आरोप निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला तरुणाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. संशयित आरोपीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती कुमार यांनी या प्रकरणात आरोपीचा हेतू काय होता हे महत्त्वाचे आहे. या निरीक्षणासह न्यायालयाने याचिकाकर्त्याची बाजू ग्राह्य धरली.

Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी