‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी पश्चिम आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी अरब राष्ट्रांनी बजावलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. दुसऱ्या भारत-अरब परराष्ट्रमंत्री बैठकीसाठी अरब राष्ट्रांचे परराष्ट्रमंत्री सध्या नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.


पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘भारत आणि अरब जगतातील खोलवर रुजलेले ऐतिहासिक आणि जनसामान्यांमधील संबंधांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. हे संबंध वर्षानुवर्षे दोन्ही बाजूंमधील नाते अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणा देत आहेत.’ पंतप्रधानांनी भारत-अरब भागीदारीसाठी भविष्यातील आपला द़ृष्टिकोन मांडला. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा यांसारख्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये दोन्ही बाजूंच्या लोकांच्या परस्पर फायद्यासाठी सहकार्य अधिक वाढवण्याबाबत त्यांनी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या बैठकीत मोदींनी पॅलेस्टिनी जनतेला भारताचा पाठिंबा कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच, गाझा शांतता आराखड्यासह (गाझा पिस प्लॅन) शांततेसाठी सुरू असलेल्या विविध प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले. प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी अरब लीगने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दलही पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Comments
Add Comment

आता स्मार्ट तंत्रज्ञानातून होणार मत्स्यपालन; मंत्री नितेश राणेंचा अभ्यास दौरा

आंध्र प्रदेशच्या मत्स्यव्यवसाय अभ्यास दौऱ्यादरम्यान भीमावरम येथील AquaExchangeच्या IoT-सक्षम मत्स्यपालन केंद्राला भेट

Monsoon Update : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार , पुढील 3-4 दिवसांत देशाच्या आणखी भागातून परतीचा प्रवास; 'या' राज्यांमध्ये मात्र मुसळधार पावसाचा इशारा

Monsoon Update : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आज, 8 ऑक्टोबर 2026 रोजी, महाराष्ट्राच्या उर्वरित भागातून माघार घेतली आहे. यासोबतच गोवा,

Sheep and goat accident news : धक्कादायक घटना! मालवाहू ट्रकने मेंढ्या-शेळ्यांच्या कळपाला उडवले; २५ निष्पाप जनावरांचा जागीच मृत्यू, ३० गंभीर

मोरबी : गुजरात राज्यातील मोरबी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर एक अतिशय भयानक आणि अंगावर काटा आणणारी अपघाताची

Nana Patekar Death News: नानांनी मित्राला केला होता शेवटचा मेसेज, मेसेजमध्ये म्हणाले होते की...

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज (८ ऑक्टोबर २०२६) पहाटे गोव्यातील दोना पावला येथे हृदयविकाराच्या झटक्याने

PM Modi : ‘सायबर गुन्हेगारीला सीमा नसतात!’ IMC 2026 मध्ये पंतप्रधान मोदींचे डीपफेक्स अन् सायबर फ्रॉडविरुद्ध जागतिक नियमावलीचे आवाहन

नवी दिल्लीतील 'यशोभूमी' येथे आयोजित १० व्या 'इंडिया मोबाईल काँग्रेस' (IMC) 2026 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र

आपल्याच शैलीतील क्रांतीकारी कलाकार': नाना पाटेकरांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भावपूर्ण श्रद्धांजली; अभूतपूर्व योगदानाचा केला गौरव

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले.