ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज (८ ऑक्टोबर २०२६) पहाटे गोव्यातील दोना पावला येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मनोरंजन विश्वावर या बातमीने शोककळा पसरली. चाहत्यांकडून तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आज पुण्याजवळील डोणजे गावातील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, नानांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
मणिपाल हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले, 'नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यांना साधारण साडेचारच्या सुमारास आणले गेले आणि साडेपाच वाजेपर्यंत त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांना वाचवण्याचे आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु रुग्णालयात आणले तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना वाचवण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे ते एक तास 'कार्डियाक मसाज' देण्यात आला, तरीही त्यांना वाचवता आले नाही.'
मध्यरात्री अडीचच्या सुमारास नानांनी आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचा मेसेज आपल्या मित्राला पाठवला होता. परंतु रात्र असल्याने त्याने तो मेसेज पाहिला नाही. सकाळी मेसेज पाहिल्यावर साधारण चार वाजता तो त्यांच्या घरी गेला. तेव्हा त्यांना खूप घाम फुटला होता. त्यांनी प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला, पण नाना हळूहळू बेशुद्ध पडू लागले. नाना रुग्णालयाच्या जवळच राहत असल्याने मित्राने त्यांच्या केअरटेकरला रुग्णालयात पाठवले. रुग्णवाहिकेतून त्यांना नेण्यात आलं.
डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीनुसार, 'रुग्णालयातील आपत्कालीन टीम तिथे गेली. ते तिथे पोहोचले तेव्हा नाना पूर्णपणे प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांनी कार्डियाक मसाज सुरू केला. त्यांनी नानांना कार्डियाक मसाजवरच साधारण ४:२० किंवा ४:३० च्या सुमारास रुग्णालयात हलवले. रुग्णालयात देखील त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. पण रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे या प्रकरणाची मेडिको-लीगल केस म्हणून नोंद करण्यात आली आहे. आता मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आला असून त्यानंतर कुटुंबीयांकडे सोपवला जाईल.' यावेळी नानांचे कुटुंबीय तिथे नव्हते, पण त्यांचे मित्र आणि एक केअरटेकर त्यांच्यासोबत होते, असेदेखील डॉक्टरांनी सांगितले.