Sheep and goat accident news : धक्कादायक घटना! मालवाहू ट्रकने मेंढ्या-शेळ्यांच्या कळपाला उडवले; २५ निष्पाप जनावरांचा जागीच मृत्यू, ३० गंभीर

एका भरधाव वेगातील अनियंत्रित ट्रकने त्यांना चिरडले. या दुर्दैवी घटनेत तब्बल २३ मेंढ्या आणि २ शेळ्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला, तर सुमारे ३० मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

मोरबी : गुजरात राज्यातील मोरबी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर एक अतिशय भयानक आणि अंगावर काटा आणणारी अपघाताची घटना घडली आहे. माळिया-कच्छ नॅशनल हायवेवरून मेंढ्या आणि शेळ्यांचा कळप रस्ता ओलांडत असताना, एका भरधाव वेगातील अनियंत्रित ट्रकने त्यांना चिरडले. या दुर्दैवी घटनेत तब्बल २३ मेंढ्या आणि २ शेळ्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला, तर सुमारे ३० मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.



सीसीटीव्ही फुटेज आले समोर


माळिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघाताचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कच्छ जिल्ह्यातील भचाऊ तालुक्यातील जंगी गावचे रहिवासी असलेले विभाभाई रबारी हे आपल्या मेंढ्या आणि शेळ्यांना घेऊन रस्त्याने चालले होते. त्याच वेळी महामार्गावरून येणाऱ्या एका भरधाव मालवाहू ट्रकने या निष्पाप प्राण्यांच्या कळपाला जोरदार धडक दिली.



चालकाविरोधात गुन्हा दाखल


या प्रकरणी पशुपालक विभाभाई यांनी माळिया पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रकचालक उस्मान मोहम्मद रमजान नाइच याने अत्यंत बेदरकारपणे आणि वेगाने वाहन चालवून जनावरांना चिरडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. धडक इतकी भीषण होती की २५ जनावरांचा जागीच प्राण गेला, तर ३० जनावरे रक्ताच्या थारोळ्यात पडली. घटनास्थळावरील दृश्ये अत्यंत विदारक आणि हतबल करणारी होती.



पशुपालकाचे ६५ हजारांचे नुकसान; पोलिसांकडून तपास सुरू


पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ट्रकचालकावर कायदेशीर कारवाई करत आहेत. या अपघातामुळे आपले सुमारे ६० ते ६५ हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे विभाभाई रबारी यांनी सांगितले. केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर ही जनावरे त्यांच्यासाठी रोजगाराचे मुख्य साधन आणि कुटुंबातील सदस्यांसारखी होती, त्यामुळे रबारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात

'काशी तमिळ संगमम ५.०'ला सुरुवात, २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना

चेन्नई : तमिळनाडू आणि काशी यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या