शिवसेनेच्या मुंबई महापालिका गटनेतेपदी अमेय घोले

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी तरुण नगरसेवक आणि एकेकाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळ असलेले अमेय घोले यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आलेले असून हे दोन्ही पक्ष आपल्या पक्षाची नोंदणी एकत्रपणे करतात की स्वतंत्र याबाबत चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने आपला गटनेता निवडून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.


मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेते पदी गणेश खणकर यांची निवड करण्यात आल्यानंतर शिवसेनेने आपला गटनेता निवडला. शिवसेनेतील सर्वात तरुण आणि अभ्यासू अशी त्यांची ख्याती आहेत. भाजपचे ८९ तर शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आलेले असून यासर्व नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यालयात नोंदणी झाली नवहती. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक आणि वैधानिक तसेच विशेष समित्यांमध्ये संख्याबळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही पक्ष गट करून एकत्र नोंदणी करतील अशी चर्चा होती. पण दोन्ही पक्षाचे स्वतंत्र गटनेते निवडले गेले आहेत.


अमेय घोले हे प्रभाग १७८मधून निवडून आले असून त्यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर पक्षाच्या सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे,पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी त्यांचे अभिनंदन केले. गटनेते निवडीनंतर भाजप आणि शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, माजी खासदार मनोज कोटक आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर भाजपसोबतच सोमवारी शिवसेना नगरसेवकांची नोंदणी केली जात आहे.

Comments
Add Comment

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

LPG Price Hike : सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात वाढ

मुंबई : सप्टेंबर महिन्याची सुरुवातच महागाईच्या झटक्याने झाली आहे. दूध आणि साखरेच्या दरानंतर आता व्यावसायिक LPG

DRI Gold Smuggling Seizure : DRI ची मोठी कारवाई! ६५ कोटींच्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; ४२ किलोहून अधिक परदेशी सोने जप्त

नवी दिल्ली : देशभरात सुरू असलेल्या सोन्याच्या तस्करीविरोधातील कारवाईला वेग देत डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.