रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा; ३६ गंभीर आजारांच्या औषधांवर करमुक्ती

संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. कर्करोगासह इतर गंभीर आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या जीवनरक्षक औषधांवरील कर पूर्णपणे काढून टाकण्याची घोषणा सरकारने केली असून, त्यामुळे या आजारांवरील उपचारांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कर्करोग आणि अन्य गंभीर आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल ३६ जीवनरक्षक औषधांना करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आणखी सहा महत्त्वाच्या औषधांवर केवळ ५ टक्के कस्टम ड्युटी लागू करण्यात येणार आहे. महागड्या औषधांमुळे वाढत चाललेला वैद्यकीय खर्च लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून दीर्घकाळापासून औषधांच्या किमती कमी करण्याची मागणी होत होती. आता या निर्णयामुळे कर्करोगासह गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. कर्करोग हा अतिशय धोकादायक आणि जीवघेणा आजार मानला जातो. त्याचे उपचार दीर्घकालीन आणि खर्चिक असतात. कर्करोगाच्या उपचारांसाठी विविध प्रकारची औषधे वापरली जातात, त्यात केमोथेरपीचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. आता केमोथेरपीसाठी वापरली जाणारी औषधे स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. फुफ्फुसांचा, स्तनाचा, अंडाशयाचा आणि रक्ताच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगांवरील उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील मूलभूत शुल्क हटवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण