बदलापूरमध्ये अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर; ४०० हून अधिक बांधकामे हटवणार

बदलापूर : नगरपालिका निवडणुकांनंतर बदलापूर शहरात प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून, अनधिकृत बांधकामांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंबरनाथ–बदलापूर महामार्ग आणि पनवेल महामार्गालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारती व व्यावसायिक गाळ्यांवर आज नगरपालिकेने बुलडोझर चालवला. या अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.


गेल्या काही वर्षांत बदलापूरच्या झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे अनधिकृत बांधकामांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. विशेषतः मुख्य रस्त्यालगत उभारलेली दुकाने, गाळे आणि तात्पुरत्या स्वरूपातील बांधकामांमुळे वाहतूक, सौंदर्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता नगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.


पालिकेच्या माहितीनुसार, ही कारवाई पुढील ८ ते १० दिवस सलग सुरू राहणार असून, शहरातील सुमारे ४०० पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे हटवण्याचा* निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


पालिकेचे मुख्याधिकारी *मारुती गायकवाड* यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई राबवली जात आहे. “अनधिकृत बांधकामांमुळे शहराचा नियोजित विकास खुंटतो. त्यामुळे नियमबाह्य बांधकामांवर कठोर कारवाई केली जाणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, या कारवाईचे शहरातील अनेक नागरिकांनी स्वागत केले आहे. अनधिकृत बांधकामांमुळे सार्वजनिक जागा अडवल्या जात होत्या, तसेच वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत होता, अशी नागरिकांची तक्रार होती. मात्र, काही नागरिकांनी ही कारवाई सातत्याने सुरू राहावी आणि भविष्यात पुन्हा अशी बांधकामे उभी राहू नयेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.


यापूर्वी अनेक वेळा कारवाईनंतर काही महिन्यांतच त्याच ठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे यावेळी प्रशासन ही मोहीम कितपत प्रभावीपणे राबवते, याकडे संपूर्ण बदलापूरचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी