Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या पहिल्या शासकीय दौऱ्याला सुरुवात; स्वर्गीय विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्याप्रमाणेच कामाचा धडाका सुरू केला आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या आज म्हणजेच सोमवार २ फेब्रुवारी रोजी कराड आणि फलटणच्या दाैऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवार आज सकाळीच साताऱ्याकडे रवाना झाल्या. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांचा हा पहिलाच शासकीय दौरा आहे.


कराड येथे सुनेत्रा पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जात अजित पवारांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांच्या घरी त्या सांत्वनपर भेट देतील. त्यानंतर त्या बारामतीकडे रवाना होतील.






सुनेत्रा पवारांकडे तीन खात्यांची धुरा

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर झालेल्या खातेवाटपात सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या तीन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित दादांकडे असलेले महत्त्वाचे 'अर्थ व नियोजन' खाते मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. या निर्णयामुळे राज्याचा २०२६-२७ चा आगामी अर्थसंकल्प मांडण्याचा मान फडणवीसांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे