Rashmika Mandanna Latest News: रश्मीका मदांना व विजय देवरकोंडाच फेब्रुवारीमध्ये लग्न सोहळा; रश्मीकाची धक्कादायक प्रतिक्रिया...

गोल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिक मदाना व अभिनेता विजय देवरकोंडा या दोघांच्या लग्नाबद्दल चर्चानां उधान आलं आहे. या दोघांच लग्न २ फेब्रुवारी रोजी होणार आहे अशी सर्वत्र बातमी पसरत आहे. मात्र यावर अभिनेत्री रश्मिकांने लग्नांच्या अफवांनवर आपली प्रतिक्रिया देत अफवांना ब्रेक दिला आहे.

अभिनात्री रश्मिका मंदान्ना व विजय देवरकोंडा याच्या दोघांचा चाहते वर्गामध्ये नेहमी चर्चेचा विषय राहीला आहे.२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या गीता गोविंदम या चित्रपटातून दोघांनीही चाहत्यांमध्ये आपली वेगळीच छाप सोडली आहे. बहुतांश चाहंत्याना असं वाटत की रिल लाईफ कपल प्रत्यक्षात रिअल लाईफ मध्ये जोडीदार व्हावे. अलीकडेच सोशल मीडियावर एका इन्फ्लुएंसरने दावा केला होता की रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा २ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये शाही विवाह करणार आहेत. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आणि अनेकांनी या बातमीवर विश्वासही ठेवला. मात्र, ही बातमी आता पूर्णपणे अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एका मुलाखतीदरम्यान रश्मिका मंदान्ना यांनी स्वतः या लग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली असून, २ फेब्रुवारी रोजी लग्न होणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत रश्मिकाने या अफवांना पूर्णविराम दिला असून, सध्या अशा कोणत्याही लग्नाची तयारी नसल्याचे सांगितले आहे.

तरीदेखील, सोशल मीडियावर आता २६ फेब्रुवारी या नवीन तारखेबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. काही इन्फ्लुएंसरच्या म्हणण्यानुसार उदयपूरमध्ये एका सेलिब्रिटीच्या लग्नाची तयारी सुरू असून, ते लग्न रश्मिका आणि विजयचेच असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप दोघांकडूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
एकंदरीत, रश्मिका मंदान्ना यांनी स्वतः लग्नाच्या बातम्यांना अफवा ठरवले असून, चाहत्यांनी अधिकृत घोषणेची वाट पाहणेच योग्य ठरेल. तोपर्यंत, या चर्चांकडे केवळ अफवा म्हणून पाहावे, असेच चित्र सध्या दिसत आहे.
Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी