पुण्यात मेट्रोच्या विस्ताराला गती, हिंजवडी पिंपरी पासून .. कुठून कसा असेल मार्ग? जाणून घ्या...

पुणे : पुणेकरांचा प्रवास आता लवकरच आरामदायी होणार आहे. कारण पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन लवकरच सुरू होणार असून प्रवासाचा वेळ हा कमी होणार आहे. रेल्वे प्रमाणे आता मेट्रोही आपले जाळे देशभरात विणत चालली आहे. मेट्रो ही काळाची गरज आहे. त्यामुळे मेट्रोचा विस्तार हा झपाटयाने होत आहे.



पुणेकरांच्या वेळेची होणार बचत


हिंजवडी ते शिवाजी नगरपर्यंत प्रवास करायला सध्या २ तास लागतात. हाच वेळ सरळ अर्ध्या तासावर येणार आहे. त्यासोबतच काळ जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात पुण्यातील मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी ५१७ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली गेली आहे.



मेट्रो ३ चे मार्चमध्ये होणार उदघाटन


पुणेकरांसाठी हि सेवा मार्च मध्ये सुरु होणार असून उन्हाच्या तडाख्यात पुणेकरांना गारेगार प्रवास करायला मिळणार आहे. हिंजवडी ते शिवाजी नगर या चाचणी फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून पुणे मेट्रो ३ उदघाटनासाठी सज्ज झाली आहे.



मेट्रोमुळे पुणेकरांना मिळणार वाहतूक कोंडीतून सुटका


या मेट्रोचे कनेक्शन थेट पुण्याच्या आयटी सेक्टरशी जोडले जाणार आहे. या मार्गावर आयटी कर्मचाऱ्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही लवकरच संपणार आहे. त्यामुळे तब्बल २ लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.


विद्यापीठ चौकात या मेट्रोवरती डबल डेकर वाहतूक मार्ग उभारणार आहेत. यामुळे सर्वाधिक वाहतूक कोंडी असल्या भागातील कोंडी फोडण्यात यश मिळणार आहे. यामध्ये सर्वात खालच्या स्थरावर स्थानिक वाहनांची वाहतूक त्यावरील उड्डाणपुलावर आणखी एक वाहतूक मार्ग आणि त्यावरती मेट्रो मार्गिका असणार आहे.



कोणत्या स्थानकांचा होणार समावेश


काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात महा मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार करण्याबाबत माहिती देण्यात आली. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन मार्गिका सुरु असून, तिसरी प्रवाशांसाठी लवकरच सुरु होईल. तसेच, २०२७ पर्यंत पिंपरी- निगडी अशी ४.५ किमी लांब मेट्रोचं काम पूर्ण होण्याची शक्यात आहे. या मार्गिकेच ५० टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात विस्तारामध्ये खडकवासला- स्वारगेट- खराडी , रामवाडी- वाघोली-विठ्ठलवाडी, वनाज - चांदणी चौक आणि नल स्टॉप- वारजे या प्रमुख मार्गांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी