मलंगगडावरील बांधकामाबाबत न्यायालयाकडून आपल्याला अपेक्षित निर्णय लागणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री मच्छिंद्रनाथांचे दर्शन


माघी पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिवसेनेकडून मलंगगडावर फडकले भगवे निशाण


फनिक्युलर रोप वे मुळे भाविकांची मोठी सोय


ठाणे : श्री मलंगगडावरील काही बांधकामाबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात लवकरच अपेक्षित असलेला निर्णय येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. माघी पौर्णिमेच्या दिवशी श्री मलंगनाथ गडावर पुन्हा एकदा भक्ती, आस्था आणि उत्सवाच्या संगमाने उजळून निघाला आहे. या भव्य उत्सव यात्रेबाबत माहिती देताना, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही मंगल यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून यापुढेही याच उत्साहात सुरू राहील असे सांगितले.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर श्री मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधी स्थळाचे दर्शन आणि पूजा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते.


राज्यभरातून तसेच परराज्यातूनही हजारो-लाखो भाविक मलंगनाथाच्या दर्शनासाठी मलंगगडावर दाखल होत आहेत. नाथांच्या समाधीचे दर्शन घेत भक्त भावविवश होत असून, परिसरात दिवसभर “नाथांचा जयघोष” घुमत आहे. यात्रेनिमित्त संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.


यावर्षी यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झाले असून भाविकांसाठी फ्युनिक्युलर (रोपवे) सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वयोवृद्ध, महिला आणि चालण्यास अडचण असलेल्या भाविकांनाही सहजपणे मलंगनाथांचे दर्शन घेता येत आहे. पूर्वी दर्शनापासून वंचित राहणाऱ्या अनेक भक्तांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.


धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी सुरू केलेली ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्याचे काम आजही भक्त आणि सेवाभावी संस्था करत असून, यात्रेचा अनुभव अधिक सुखकर आणि सुरक्षित बनवण्यावर भर दिला जात आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मलंगगड परिसरातील मालमत्तांबाबत न्यायालयात प्रकरण सुरू असून, लवकरच यावर न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याचे सांगितले.


यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते.

Comments
Add Comment

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र