राज्यातील सर्व अपूर्ण विमानतळे ‘एमएडीसी’कडे देणार मुख्यमंत्र्यांचे निर्देश; विमानतळ विकासात सिडको आणि नगरविकास विभागाचे सहकार्य घेणार

मुंबई : राज्यातील विमानतळ विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) क्षमता वाढवून राज्यातील निर्माणाधीन आणि अपूर्ण असलेली सर्व विमानतळे विकासाकरिता या कंपनीकडे देण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. विमानतळ विकासाची एकसंध आणि प्रभावी यंत्रणा उभारण्यावर भर देत त्यांनी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.


वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर आणि परिसर गुंतवणुकीचे केंद्र बनत असून औद्योगिकरण आणि नागरीकरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, प्रधान सचिव (उद्योग) पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानतळासाठी आवश्यक भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करून विमानतळ विकासाचा मोठा टप्पा पार करण्याचे निर्देश दिले. विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेची एक निश्चित पद्धत ठरवावी, तसेच भूसंपादनाची कार्यवाही एमआयडीसीने पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. विमानतळ विकास प्रक्रियेत सिडको आणि नगरविकास विभागाने आपापली जबाबदारी निश्चित करून ती प्रभावीपणे पार पाडावी, असे निर्देश देण्यात आले. विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित परिसर ‘डेव्हलपमेंट झोन’ म्हणून विकसित होणार असल्याने सिडकोने आतापासूनच त्या परिसरातील जमीन उपलब्धतेची खात्री करून घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



पुरंदर विमानतळाबाबत दिले महत्त्वाचे निर्देश


- पुरंदर विमानतळाच्या उर्वरित भूसंपादनासाठी एमआयडीसीने अधिसूचना काढावी, तसेच विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेबाबतचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सद्यस्थितीत प्रस्तावित क्षेत्रापैकी १ हजार २१६ हेक्टर आर जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण करून त्यासंदर्भातील हरकतींसह सविस्तर अहवाल शासनास सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.


- पुरंदर विमानतळासाठी पुणे जिल्ह्यातील वनपुरी, कुंभार वळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या गावांमध्ये भूसंपादनासाठी गावनिहाय उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी दर्जाचे भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण