मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही - प्रफुल्ल पटेल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून विरोधकांकडून जाणीवपूर्वक चुकीचे नेरेटिव्ह पसरवले जात असल्याचा आरोप करत प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा घाईघाईत शपथविधी करण्यात आला आणि त्यासाठी आपण व सुनील तटकरे कारणीभूत असल्याचे आरोप तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांवर पटेल यांनी सविस्तर भाष्य केले.


प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत नाही आणि असा कोणताही विचार माझ्या मनात नाही. अध्यक्षपदाचा निर्णय माझ्याशिवाय होईल, हे मी स्पष्टपणे सांगतो. आज आमच्यासमोर विलीनीकरणाचा विषय महत्त्वाचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता कोण असेल, हा पूर्णपणे आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे.


सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना पटेल यांनी सांगितले की, सर्व भावना समजून घेऊनच हा निर्णय घेण्यात आला. पवार कुटुंबात तीन दिवसांचा दुखवटा असल्याची माहिती स्वतः सुनेत्रा पवार यांनी दिली होती. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाबाबत आमच्या मनात नेहमीच आदराची भावना आहे.


आमच्याबाबत अनेकांकडून उलटसुलट वक्तव्य केली जात असून, राज ठाकरे किंवा अन्य कोणाचा आमच्या पक्षाशी काय संबंध, असा सवालही पटेल यांनी उपस्थित केला. काहीजण जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.



विलीनीकरण होणार का?


अजित पवार राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बाजूने होते, त्यादृष्टीने बैठकाही झाल्या, असा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. याविषयी पटेल म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढाव्यात, असा निर्णय अजित पवार यांनी घेतला होता आणि त्याबाबत आमच्याशी चर्चा झाली होती. मात्र ही चर्चा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतीच मर्यादित असल्याचे अजित पवार यांनी अनेक मुलाखतींमध्ये स्पष्ट केले आहे, असेही पटेल यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर