Sunetra Pawar : अजितदादांचा वारसा आता सुनेत्रा वहिनींच्या हाती! पुण्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारचं; परिपत्रक जारी

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर केवळ चौथ्या दिवशी राजभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. या घाईघाईने झालेल्या शपथविधीवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. पवार कुटुंबाने तिसऱ्याच दिवशी सर्व धार्मिक विधी पूर्ण केल्याने चौथ्या दिवशी सुनेत्रावहिनींनी ही जबाबदारी स्वीकारल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्यावर आता प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा भारही सोपवण्यात आला आहे. त्यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले असून, सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.



सुनेत्रा पवारांकडे अजितदादांच्या खात्यांचा भार


उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्याकडे अजितदादांच्या ताब्यातील अर्थ खाते वगळता इतर सर्व महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केवळ सरकारमध्येच नव्हे, तर पक्षातही सुनेत्रा पवार यांचे स्थान भक्कम झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच दिली जाणार असल्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या प्रवासात आता 'सुनेत्रा पर्व' सुरू झाल्याचे मानले जात आहे. प्रशासकीय पातळीवर सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. राज्य शासनाने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक (GR) आज ३ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केले. अजितदादांनी ज्या जिल्ह्यांच्या विकासाचा पाया घातला, त्याच जिल्ह्यांची जबाबदारी आता सुनेत्रावहिनींच्या खांद्यावर असणार आहे. सुनेत्रा पवार येत्या ९ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील आपल्या कार्यालयातून कामाचा श्रीगणेशा करतील. ज्या दालनातून अजितदादा राज्याच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवत असत, त्याच दालनातून आता सुनेत्रा पवार जनतेला न्याय देण्यासाठी सज्ज होतील.



अजितदादांनंतर आता सुनेत्रा वहिनींकडे बीडच्या पालकत्वाची धुरा


राज्याचे लाडके नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे जन्मस्थान असलेल्या बारामतीसह बीड जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बारामतीकरांनी आपल्या लाडक्या सुपुत्रासाठी, तर बीडच्या जनतेने आपल्या कर्तव्यदक्ष पालकमंत्र्यासाठी व्यापार-व्यवहार बंद ठेवून अलोट जिव्हाळा व्यक्त केला. अल्पकाळातच अजितदादांनी बीडकरांशी निर्माण केलेले नाते आज या बंदच्या माध्यमातून अधोरेखित झाले. अजित पवारांच्या पश्चात आता बीड जिल्ह्याच्या पालकत्वाचा पेच सुटला असून, ही जबाबदारी त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही काळापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीशी संबंध असल्याच्या आरोपावरून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, त्यानंतर ही जबाबदारी अजितदादांकडे आली होती. आता त्याच संवेदनशील जिल्ह्याचे पालकत्व सुनेत्रा वहिनी कशा प्रकारे निभावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला