शाहरुख खानच्या ‘किंग’च्या आंतरराष्ट्रीय वितरणासाठी रेड चिलीज एंटरटेनमेंट, मार्फ्लिक्स पिक्चर्स आणि यशराज फिल्म्स यांची ऐतिहासिक भागीदारी

मुंबई : रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी शाहरुख खान अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘किंग’च्या आंतरराष्ट्रीय वितरणासाठी यशराज फिल्म्ससोबत हातमिळवणी केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन दिग्गज बॅनर्स एकत्र येत असल्याने ‘किंग’बाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.


२०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘किंग’ने घोषणेदरम्यानच जबरदस्त चर्चा निर्माण केली आहे. आता यशराज फिल्म्स आंतरराष्ट्रीय वितरणाची जबाबदारी सांभाळणार असल्याने, हा चित्रपट जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये भव्य स्तरावर प्रदर्शित होणार आहे.


https://www.instagram.com/p/DUSm-bEjMJg/?igsh=am5jMWF0dnMyMGw1


या भागीदारीची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली असून, निर्मात्यांनी ‘किंग’च्या जगाची एक झलक चाहत्यांसमोर मांडली आहे. या झलकांमध्ये शाहरुख खान एका धाडसी, आक्रमक आणि नव्या अवतारात दिसत असून, भव्य लोकेशन्स आणि प्रभावी फ्रेम्समुळे चित्रपटाची दृश्यभाषा अधिक ठळक झाली आहे. या दमदार प्रतिमांमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, २०२६ च्या अखेरीस ‘किंग’ गर्जना करण्यास सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.


रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांच्या निर्मितीखाली तयार होणारा ‘किंग’ हा २०२६ मधील सर्वाधिक अपेक्षित बिग-स्क्रीन स्पेक्टॅकल ठरणार असून, तो २४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ