यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ दिवसांचे? - नियोजन सुरू; विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर परिषदेत आशिष जयस्वाल मांडणार अर्थसंकल्प

मुंबई : राज्य विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण २६ दिवसांचे असण्याची शक्यता असून, त्यापैकी सुट्ट्या वगळता २० दिवस प्रत्यक्ष कामकाज होणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या तारखा अंतिम केल्या जातील.


संसदीय कार्य विभागाने तयार केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार २३ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असून, विधान परिषदेत ही जबाबदारी अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल पार पाडणार आहेत. दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प कोण सादर करणार, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही धुरा स्वतः खांद्यावर घेतली आहे.


अर्थसंकल्पीय तयारी ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. किमान सहा महिन्यांपासून विविध योजना, तरतुदी, नव्या प्रस्तावांचा समावेश, तसेच ऐनवेळी उद्भवणाऱ्या विषयांसाठीची आर्थिक तरतूद यावर सखोल काम केले जाते. अजित पवार हे गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रक्रियेत सहभागी होते. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार असल्याने अंतिम टप्प्यात कोणते बदल होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण