विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी मतदारसंघातून यंदा रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि युवा सेनेचे सचिव विकास गोगावले यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरून आपल्या राजकीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली आहे. तरुण नेतृत्व, स्थानिक पातळीवरील मजबूत संपर्क आणि कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा यामुळे या उमेदवारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


प्रचाराचा नारळ फोडताच मतदारसंघात शिवसेनेचे वातावरण अधिकच बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. विविध गावांमध्ये सभा, भेटीगाठी आणि संवाद यात्रांच्या माध्यमातून विकास गोगावले थेट मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रचाराला सुरुवात होताच राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत गोगावले यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. या घडामोडींमुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादी-भाजप युतीकडून नीलेश महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे.


मात्र वाढता जनसंपर्क, तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि होत असलेले पक्ष प्रवेश यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास उमेदवार विकास गोगावले यांनी व्यक्त केला. विकासाच्या मुद्द्यावर आधारित निवडणूक लढवत मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच नव्या दमाच्या नेतृत्वामुळे नाडगावतर्फे बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक अधिकच उत्सुकतेची ठरत असून, या लढतीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Raigad Shed Collapse : रायगडमध्ये मोठी दुर्घटना : खालापूरजवळ लॉजिस्टिक वेअरहाऊसचे शेड कोसळले; २० ते २५ कामगार अडकल्याची किंवा जखमी झाल्याची भीती

रायगड : रायगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. रायगडमधील खालापूर तालुक्यातील

Panvel Karjat Double Railway Line: पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; प्रवाशांची प्रतीक्षा संपणार?

पनवेलकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पनवेल - कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात आले असून

Diveagar Accident : दिवेआगर दुर्घटनेची सखोल चौकशी होणार; दोषींवर कडक कारवाईचे निर्देश

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.

दिवेआगर बीचवर सहल ठरली शेवटची...; पुण्यातील 8 विद्यार्थी समुद्रात बुडून मृत

रायगड : रायगड जिल्ह्यातील अत्यंत लोकप्रिय आणि सुंदर असलेल्या दिवेआगर बीचवर (Diveagar Beach) एक अत्यंत हृदयद्रावक आणि

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर थरार! चालत्या बसमधून धुराचे लोट अन् काही क्षणातच...; 14 प्रवाशांचा थरारक जीव वाचला

पनवेल : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. पनवेल हद्दीतील

Pen ganpati idol : पेणच्या गणेशमूर्तींचा जगभरात डंका! यंदा ७० लाखांहून अधिक मूर्तींची विक्री; तब्बल २० लाख बाप्पा परदेशात रवाना

पेण : गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2026) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील