पनवेल : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. पनवेल हद्दीतील किलोमीटर 16 जवळ एका खासगी प्रवासी बसला (GHYUNDAI TRAVELS - क्रमांक: MP 44 ZB 6776) अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली असली, तरी प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.(Mumbai Pune Expressway Bus Fire)
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंधित पुरावे असलेला पेन ड्राइव्ह त्यांचे वडील सतीश सालियन आणि ...
प्रसंगाधनामुळे टळली जीवितहानी
मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा बसमध्ये एकूण 14 प्रवासी प्रवास करत होते. चालत्या बसमधून अचानक धूर आणि ज्वाला बाहेर येऊ लागल्या. आग वेगाने पसरण्यापूर्वीच चालक आणि सर्व प्रवाशांनी अत्यंत प्रसंगावधान राखत त्वरित गाडीतून खाली उडी घेतली. यामुळे सर्व 14 प्रवाशांची सुखरूप सुटका झाली असून, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात
घटनेची माहिती मिळताच आयआरबी (IRB) आणि देवदूत यंत्रणेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या आगीच्या सत्रामुळे आणि धुराच्या लोटांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती, मात्र नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.(Mumbai Pune Expressway Bus Fire)
वुमन्स प्रीमियर 2027 स्पर्धेसाठी पाचही फ्रेंचायझी सज्ज झाल्या आहेत. त्यासाठी संघांची बांधणी सुरू असून प्रशिक्षक स्टाफ बदलाचे वारे वाहू लागले आहे. असं ...
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
या बसला अचानक लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, बसच्या एसी (AC) मधील तांत्रिक बिघाडामुळे चालत्या बसने पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज यंत्रणांकडून वर्तवण्यात येत आहे. पोलीस आणि संबंधित पथक या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.(Mumbai Pune Expressway Bus Fire)