गुवाहाटीत घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शारीरिक मानसिक अत्याचार; व्हिडीओ व्हायरल

गुवाहाटी : देशभरात मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. घरकाम, अत्याचार, बलात्कार, असमान वागणूक हे सगळं सहन करूनही आजची स्त्री या जगात भक्कमपणे आपलं स्थान निर्माण करताना आपल्याला दिसत आहे. अश्यातच गुवाहाटीच्या पंजवारी येथे मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच सगळीकडे खळबळ उडाली आहे.



नेमकं घडलं काय ?


गुवाहाटी येथील पंजाबारी येथील जुरीपारमधील हाऊस नंबर ६९ मध्ये घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी अमरीन अख्तर लस्कर नावाच्या महिलेच्या घरी मागील सहा वर्षांपासून घरकाम करत होती. त्यानंतर तिच्यावर सतत अत्याचार होते होते तसेच तिला मारहाण केली जात होती.



अश्या प्रकारे गुन्हा उघडकीस आला


स्थानिक लोकांना संशयास्पद गोष्टी आढळल्याने त्यांनी जिल्हा श्रम फोर्सकडे तक्रार केली, आणि या तक्रारीनुसार जिल्हा श्रम अधिकाऱ्यांनाही घरात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. टीम घरात पोहोचताच महिलेने मुलगी घरात नाहीये,मुलीचे वडील मुलीला घेऊन गेले अशी खोटी माहिती अधिकाऱ्यानं दिली. परंतु अधिकाऱ्यांनाही घरात घुसून छापेमारी केली असता. धक्कादायक प्रकार समोर आला. घरातील बेडमध्ये चक्क मुलीला जवळपास २५ मिनिटे त्यांनी लपवून कोंडून ठेवले होते.


 


मुलीचे स्पष्टीकरण


अधिकाऱ्यांनी मुलीला बाहेर काढले. बाहेर आल्यावर मुलगी बेशुद्ध पडली. शुद्धीवर येताच जोरजोरात रडू लागली, प्राथमिक चौकशीत मुलीने सांगितले की तिला खूप काळापासून मारहाण आणि अत्याचार सहन करावे लागत होते. त्यांनतर तिला त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पुढील चौकशी सुरु असून कुटुंबावर योग्य ती कारवाई लवकरच करण्यात येईल.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''