गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. संपूर्ण प्रकल्पाच्या लांबीच्या दृष्टीने हा उड्डाणपूल अधिक आव्हानात्मक आहे. डॉ. हेडगेवार चौक येथे १२० मीटर लांबीचा पूल हा 'केबल स्टेड' स्वरुपाचा असून 'मुंबई मेट्रो - ४' च्या खालील पातळीवर म्हणजे पहिल्या स्तरावर प्रस्तावित आहे. मुख्‍य उड्डाणपूल प्रकल्पाचे एकूण तीन प्रमुख भाग आहेत. मुख्य उड्डाणपूल तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंना तानसा जलवाहिनीवर उभारले जाणारे दोन छोटे उड्डाणपूल अशी विभागणी आहे. यापैकी उत्तर दिशेकडील तानसा जलवाहिनीवरील छोटा उड्डाणपूल पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.



गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता हा मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या प्रकल अंतर्गत मुलुंड येथील पूर्व द्रुतगती मार्ग आणि गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती मार्ग यांना थेट जोडण्याची योजना आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प चार टप्प्यांत विकसित करण्यात येत आहे. तिस-या टप्‍प्‍यातील भाग अ मध्‍ये मुलुंड (पश्चिम) खिंडिपाडा येथील गुरु गोविंद सिंग रस्‍त्‍यावरील उन्‍नत चक्रीय मार्ग व डॉ. हेडगेवार चौक येथे केबल स्‍टेड यांच्‍यासह उड्डाणुलाची संरचना व बांधकामे आदींचा समावेश आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुलुंड (पश्चिम) येथील सोनापूर जंक्‍शन येथे भेट देऊन उड्डाणपूल प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, विविध निर्देश दिले. महानगरपालिका अभियंते, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते.



गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत मुलुंड (पश्चिम) येथील खिंडिपाडा परिसरातील गुरु गोविंद सिंग मार्गावर उन्नत चक्रीय मार्गासह तसेच डॉ. हेडगेवार चौक येथे केबल - स्टेड संरचनेसह उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल दरम्यान सुमारे १.८९ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधण्यात येत असून, संपूर्ण प्रकल्पाच्या लांबीच्या दृष्टीने हा टप्पा अधिक आव्हानात्मक ठरत आहे. मुख्य उड्डाणपुलासाठी एकूण ४८ खांब प्रस्तावित असून त्यापैकी ३९ खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. तसेच उड्डाणपुलाच्या एकूण ४७ अंतरखंडांपैकी १० अंतरखंडांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यासोबतच मुख्य उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना तानसा जलवाहिनीवर दोन छोटे उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. ही सर्व कामे समांतरपणे पूर्ण करून मुलुंड भागातील गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाची संपूर्ण कामे १५ जून २०२७ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Local Train : रेल्वे प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Prakash Abitkar : 'अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबवा'

मुंबई : महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार

BARTI : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित

Goregaon Bus Fire : गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली खासगी बस जळून खाक; धुराच्या लोटांमुळे प्रवाशांची धावपळ

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव परिसरात आज एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. गोरेगाव मेट्रो

Dahi Handi in mumbai local train : धावत्या लोकल ट्रेनमध्येच फोडली दहीहंडी! बदलापूर-ठाणे लोकलमध्ये महिला प्रवाशांचा अनोखा गोपाळकाला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात एका अत्यंत अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाची दृश्ये समोर

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा