कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष निवडू

सुनील तटकरे; २०१९ मध्ये भाजपसोबत जाण्याची अजित पवारांची इच्छा का झुगारली?


मुंबई : "राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढवलेल्या कठीण काळात पक्षाची घडी बसवण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटन मजबूत करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. विधिमंडळ पक्षनेत्याची निवड आवश्यक होती आणि ती पूर्ण करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत निर्णय घेताना कार्यकर्ते, आमदार आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन योग्य वेळी निर्णय घेतला जाईल", अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी स्पष्ट केली.


माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य मजबूत करण्यासाठी सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. अजित पवार यांनी घेतलेले निर्णय हे वैयक्तिक नव्हते, तर पक्षाच्या सामूहिक भूमिकेतून घेतलेले होते. हीच परंपरा पुढेही कायम ठेवली जाईल. सध्या विधिमंडळ पक्षनेत्याची जागा भरणे अधिक महत्त्वाचे होते. उर्वरित निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन योग्य वेळी घेतले जातील.


अजित पवारांच्या राजकीय भूमिकेवर बोलताना तटकरे म्हणाले की, २०१९ मध्ये अजित पवारांची इच्छा होती की भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार व्हावे. त्यावेळी त्यांच्या इच्छेकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांना कठोर निर्णय घ्यावे लागले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात लढत दिली, याची आकडेवारी सर्वांसमोर आहे. जनतेने एनडीएसोबत जाण्याच्या निर्णयाला मोठा कौल दिला, असेही त्यांनी नमूद केले.


विलीनीकरणाच्या चर्चांवर तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस हा एनडीएचा घटक पक्ष असून भाजपचा मित्रपक्ष आहे. सरकारमध्ये सहभाग, लोकसभा निवडणूक आणि सध्याची सत्तेतली भागीदारी पाहता विलीनीकरणाबाबत कोणतीही ठोस चर्चा झालेली नाही. विलीनीकरण कोणत्या पक्षात आणि कसे होणार, याबाबत कुणीही स्पष्ट बोलत नसल्याचे त्यांनी सांगितले.


विधिमंडळ पक्षनेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची

  • विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड जनतेच्या आणि आमदारांच्या भावनांचा आदर राखून करण्यात आली आहे. या निर्णयावर शंका उपस्थित करणे योग्य नाही, असे तटकरे यांनी ठामपणे सांगितले. अजित पवार यांनी गेल्या काही वर्षांत निर्माण केलेला जनसंपर्क आणि संघटन बळाच्या जोरावरच पक्षाला मोठा पाठिंबा मिळाल्याचा त्यांनी उल्लेख केला.

  • अजित पवार यांनी पक्षाला ज्या उंचीवर नेऊन ठेवले, ती परंपरा पुढे नेण्याचे आव्हान आता सुनेत्रा पवार आणि उर्वरित नेतृत्वासमोर आहे. विधिमंडळ पक्षनेत्या म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, आगामी काळात आमदार आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच पक्ष अधिक मजबूत केला जाईल, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा