Ajit Pawar: अजित पवार शेवटी फोनवर काय बोलले, बारामतीतून मोठी माहिती समोर येणार

बारामती : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील घडामोडींनंतर संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीत दाखल झालं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार सकाळीच बारामतीत दाखल पोहोचले आहेत. पवार यांच्या सहयोग निवास्थानी संपूर्ण पवार सांत्वन भेटीसाठी हजर राहणार आहे. यावेळी अजित पवार यांनी साधलेला शेवटचा संवाद ऐकवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


अजित पवार यांच्या बारामतीत सहयोग या निवास्थानी मागील ३ दिवसांपासून पवार कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली जात आहे. आज बुधवारी सकाळी ८ वाजता बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद काय होता, हे सर्वांना ऐकण्यात येणार आहे, अशी माहिती पवार कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, बुधवारी संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य भेटण्यासाठी हजर राहणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दोन्ही मुलं जय आणि पार्थ पवार हजर असणार आहेत. तसेच पवार कुटुंबातील सदस्यही हजर राहतील. यावेळी मोठ्या संख्येने बारामतीकर पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार आहेत. पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येणार आहेत. यावेळी शरद पवार देखील अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांची सहयोग बंगल्यावर जाऊन शरद पवार सगळ्यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.


तसेच अजित पवार यांचा 'दशक्रिया विधी' होणार नाही, असं त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आले असल्याने, आता यापुढे कोणताही वेगळा विधी केला जाणार नसल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे. ६ फेब्रुवारी रोजी त्यांचा दहावा दिवस (दशक्रिया विधी) आहे. मात्र, श्रीनिवास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबियांनी अस्थि विसर्जनाच्या वेळीच आवश्यक ते सर्व विधी पूर्ण केले आहेत. त्यामुळे आता १० व्या किंवा १३ व्या दिवसाचा कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक विधी आयोजित केला जाणार नाही.


स्वर्गीय अजित पवारांच्या अस्थींची देशव्यापी कलश यात्रा


दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थींच्या विसर्जनासाठी भव्य आणि देशव्यापी कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कलश यात्रा काश्मीर ते कन्याकुमारी अशी देशभर फिरत, पवित्र नद्या आणि प्रमुख धार्मिक स्थळांवर अस्थी-कलश विसर्जन करून पूर्ण होणार आहे. या कलश यात्रेअंतर्गत उत्तराखंडमधील हरिद्वार येथील हर की पौडी, उत्तर प्रदेशातील तीर्थराज प्रयागराजचा पवित्र संगम, तसंच वाराणसी येथील मणिकर्णिका घाट यांसह देशातील अनेक प्रमुख तीर्थक्षेत्रांवरील पवित्र नद्यांमध्ये अस्थी-कलश विसर्जन करण्यात येणार आहे. याशिवाय बिहारमधील गयाजी, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, काश्मीर आदी अनेक राज्यांमध्येही श्रद्धांजली स्वरूपात कलश विसर्जनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. ही देशव्यापी कलश यात्रा देशाच्या चारही दिशांकडे (उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम) प्रवास करणार असून ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. या कालावधीत ही यात्रा १४ पेक्षा अधिक राज्यांतून जाणार आहे. यात्रेची विधिवत सुरुवात देवभूमी हरिद्वार येथील हर की पौडी आणि तीर्थराज प्रयागराज येथील संगमातून करण्यात येणार आहे. या देशव्यापी कलश यात्रेचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा करणार आहेत.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली