HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे नुकसान होईल. तुम्ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवून घेण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर आताच सावध व्हा! ज्यांनी ही नंबरप्लेट बसवून घेतली नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.


सरकारने ही नंबर प्लेट बसवून घेण्याची ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख दिली होती, मात्र असं असूनही अनेक गाडयांना HSRP नंबर प्लेट नसल्याचे परिवहन विभागाच्या लक्षात येताच त्यांनी आता कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे.



१८ फेब्रुवारीपासून होणार कारवाई:


वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले होते. अनेकांनी अजूनही हे काम केले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दंड वसूली केली जाणार आहे. १८ फेब्रुवारीपासून वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत परिवहन आयुक्त विवेक भिमनगर यांनी दिले आहेत.


पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लाखो वाहनधारकांनी अजूनही नंबरप्लेट बसवलेली नाही. जवळपास २४ लाखांहून अधिक वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची होती. मात्र, फक्त साडेआठ लाख वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आहे. जवळपास ६५ टक्के वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यामुळेच हा कारवाईचा बडगा उचलला आहे.



किती भरावा लागणार दंड?


एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास तुम्हाला रोख रक्कम दंड भरावा लागणार आहे. १,००० रुपयांपासून ते १०,००० रुपयांपर्यंतचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी