Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर उघडपणे कथित स्वरुपात काळी जादू केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. हा संपूर्ण प्रकार जावखेडा ठोंबरे गावातील 'शिवनेरी हॉटेल' येथे घडला आहे.


या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहरा झाकलेली एक महिला दिसत आहे. घटनास्थळी हळद, कुंकू, लिंबू, बाहुली तसेच काही संशयास्पद साहित्य आढळून आलं आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावातील प्रतिष्ठित नागरिकांची तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावं लिहिलेल्या अनेक चिठ्ठ्याही सापडल्या आहेत. 30 जानेवारी रोजी ही घटना घडली असून घटनेने गावात दहशत आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.


हॉटेलबाहेर संशयास्पद साहित्य आढळलं


हॉटेलचे मालक कृष्णा भानुदास ठोंबरे यांनी नेहमीप्रमाणे 30 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता हॉटेल बंद केले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचारी कामावर आले असता, हॉटेलच्या मुख्य दरवाज्या समोरील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. हॉटेलसमोर हळद, कुंकू, लिंबू, बाहुली आणि काही संशयास्पद साहित्य पडलेले होते. त्याहूनही अधिक धक्कादायक बाब म्हणजे तेथे गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावे लिहिलेल्या अनेक चिठ्ठ्या आढळून आल्या.


संशयास्पद प्रकरण वाटल्याने हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण सत्य समोर आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की, एक अज्ञात महिला ऑटो-रिक्षातून हॉटेलबाहेर पोहोचली. तिने चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. संबंधित महिला हॉटेलसमोर लिंबू, हळद-कुंकू यासारख्या गोष्टी ठेवताना दिसत आहे. या घटनेनंतर हॉटेल मालक कृष्णा ठोंबरे यांनी तातडीने भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी