Sachin Pilgaonkar: "प्रत्येकाला वेगळं असण्याचा हक्क आहे पण..."; सचिन पिळगावकर यांनी ट्रोलर्सना सुनावलं

मुंबई: सध्या सोशल मीडियावर अनेक सामान्य व्यक्तींपासून दिग्गज व्यक्तींना ट्रोल केलं जातं. सोशल मीडियावरून त्यांची खिल्ली उडवली जाते. क्रिकेटर, राजकारणी आणि अभिनय क्षेत्रातल्या व्यक्तींना तर सतत या ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. अशातच मराठी चित्रपट सृष्टीतले दिग्दर्शक, अभिनेता, निर्माते, लेखक, गायक, डान्सर असे अष्टपैलू कलाकार सचिन पिळगावकर यांनी ट्रोलर्सना सुनावलं आहे. त्यांनी पहिल्यांदाच ट्रोलिंगवर आपलं मत मांडलं आहे.


'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या चौथ्या पर्वाच्या निमित्ताने सचिन पिळगावकर आणि गायिका वैशाली सामंत पुन्हा एकत्र येत आहेत. या शोच्या प्रमोशनच्या निमित्ताने एका मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर आपलं मत मांडलं.



काय म्हणाले सचिन पिळगावकर ?


सचिन पिळगावकर म्हणाले, "आजच्या काळात बोलताना शब्दांची काळजी घ्यावी लागते, विचार करून बोलावं लागतं. पण याचा अर्थ दुसऱ्याच्या इच्छेनुसार जगावं असा नाही. स्वतःचं आयुष्य सोडून जगायचं नाही. प्रत्येकाला वेगळं असण्याचा हक्क आहे. पण जर कोणी विचारलं तर उत्तर द्या. पटत नाही म्हणून सांगा. सिनेमाबद्दल 'हा सिनेमा आवडला नाही' किंवा 'तुमचं काम आवडलं नाही' असं म्हणण्याचा हक्क आहे. पण वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही. हे लोकांना समजत नाही तो आमचा विषय नाही. त्याकडे लक्ष दिलं तर आपलाच वेळ वाया जाईल.



सचिन पिळगावकर यांचा सकारात्मक दृष्टिकोन :


पुढे शाहरुख खानचं उदाहरण देत सचिन पिळगावकर म्हणाले की; शाहरुखला जेव्हा ट्रोलिंगबद्दल विचारलं गेलं, तेव्हा तो म्हणाला होता की, "प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. काळजी तेव्हाच करावी जेव्हा ती संख्या कमी होईल." पुढे ते म्हणाले, "ज्या लोकांनी आयुष्यात काहीच काम केलं नाही, ते मला ट्रोल करून रात्री शांत झोपतात आणि समाधान मानतात की त्यांनी मोठं काम केलं. त्यांच्या झोपेचं कारण मी आहे, त्यामुळे मी आनंदी आहे." सचिन पिळगावकर यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला.



बदल स्वीकारला पाहिजे:


ते पुढे म्हणाले, "ट्रोलर्स कदाचित यातून पैसे कमवत असतील. ठीक आहे, कमवू देत. मी ६५व्या वर्षापर्यंत पोहोचलोय (३१ डिसेंबरला पूर्ण होतं), करिअरच्या ६५व्या वर्षी जर मी इतका महत्त्वाचा वाटत असेन की लोक ट्रोल करतात, तर याहून जास्त काय हवं? आता सोशल मीडियावर मी खूप पॉप्युलर झालोय, त्यामुळे भरपूर जाहिराती मिळत आहेत. बदल स्वीकारला पाहिजे. नकारात्मकता बाजूला ठेवा, ती बदलता येत नाही. तू मजा कर, मीही मजा करतो. ट्रोलिंग करणारी ही मुले खूप छान आहेत. मी त्यांना मनापासून आशीर्वाद देतो. त्यांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं, ते खूप मोठे व्हावेत. पण ते मोठे तेव्हाच होतील जेव्हा ते दुसऱ्याच्या नावाला जितकं महत्त्व देतात तितकं स्वतःच्या नावाला देतील आणि काहीतरी स्वतःचे करून दाखवतील. काही मुलांना वाटतं मी त्यांच्याच वयाचा आहे, त्यांना माहितीच नाही की मी ६३-६५ वर्षांचा आहे. एका अर्थाने हे माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे!"

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’