अमेरिकेच्या एका गोलंदाजासमोर ढेपाळली भारताची फलंदाजी

मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषकातील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारताची फलंदाजी एका गोलंदाजासमोर पुरती ढेपाळली. अमेरिकेच्या ३८ वर्षांच्या शॅडली व्हॅन शाल्कविकने (Shadley van Schalkwyk) चार षटकांत २५ धावा देत भारताच्या चार फलंदाजांना बाद केले. त्याने ईशान किशनला २० धावा केल्या असताना मिलिंद कुमारकरवी झेलबाद केले. तिलक वर्माला २५ धावा केल्या असताना कर्णधार मोनांक पटेलकरवी झेलबाद केले. शिवम दुबेला तर भोपळाही फोडू दिला नाही आणि सौरभ नेत्रावलकरकरवी झेलबाद केले. तसेच तळाच्या फलंदाजांपैकी अर्शदीप सिंहला चार धावा केल्या असताना मिलिंद कुमारकरवी झेलबाद केले.


भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात २० षटकांत नऊ बाद १६१ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने शून्य, ईशान किशनने २०, तिलक वर्माने २५, सूर्यकुमार यादवने नाबाद ८४, शिवम दुबेने शून्य, रिंकू सिंगने ६, हार्दिक पांड्याने ५, अक्षर पटेलने १४, अर्शदीप सिंहने ४, वरुण चक्रवर्तीने नाबाद शून्य धावा केल्या आहेत.


भारत : ईशान किशन (यष्टीरक्षक) , अभिषेक शर्मा , तिलक वर्मा , सूर्यकुमार यादव (कर्णधार) , रिंकू सिंग , हार्दिक पांड्या , शिवम दुबे , अक्षर पटेल , वरुण चक्रवर्ती , अर्शदीप सिंग ,मोहम्मद सिराज


अमेरिका : अँड्रीस गॉस (यष्टीरक्षक) , सैतेजा मुक्कामल्ला , मोनंक पटेल (कर्णधार) , मिलिंद कुमार , संजय कृष्णमूर्ती , शुभम रांजणे , हरमीत सिंग , मोहम्मद मोहसीन , शॅडली व्हॅन शाल्कविक , अली खान , सौरभ नेत्रावलकर

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम