सलामीवीर अभिषेक शर्मा केला भलताच विक्रम

मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषकातील भारताचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून अमेरिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारताच्या सलामीवीर अभिषेक शर्माने अनपेक्षित अशी कामगिरी केली. यामुळे त्याच्या नावावर भलत्याच विक्रमाची नोंद झाली आहे.


भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर शून्य धावा करून बाद झाला. अली खानच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अभिषेक झेलबाद झाला. हा अभिषेक शर्माचा टी ट्वेंटी विश्वचषकातील पहिलाच सामना होता. पण या सामन्यात प्रभावी कामगिरी करणे त्याला जमले नाही.


अभिषेक शर्मा टी ट्वेंटी विश्वचषकात पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद होणारा पाचवा भारतीय खेळाडू झाला. या यादीत आधीपासूनच गौतम गंभीर, आशीष नेहरा, शार्दुल ठाकूर आणि दीपक हुडा आहेत. भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात २० षटकांत नऊ बाद १६१ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने शून्य, ईशान किशनने २०, तिलक वर्माने २५, सूर्यकुमार यादवने नाबाद ८४, शिवम दुबेने शून्य, रिंकू सिंगने ६, हार्दिक पांड्याने ५, अक्षर पटेलने १४, अर्शदीप सिंहने ४, वरुण चक्रवर्तीने नाबाद शून्य धावा केल्या आहेत.


सूर्यकुमारचा झंझावात


सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत चार षटकार आणि दहा चौकार मारत नाबाद ८४ धावा केल्या. सूर्याच्या झंझावातामुळेच भारताचे बाकीचे फलंदाज मोठी कामगिरी करू शकले नाही तरी भारतीय संघाने १५० धावांचा टप्पा पार केला.


भारत : ईशान किशन (यष्टीरक्षक) , अभिषेक शर्मा , तिलक वर्मा , सूर्यकुमार यादव (कर्णधार) , रिंकू सिंग , हार्दिक पांड्या , शिवम दुबे , अक्षर पटेल , वरुण चक्रवर्ती , अर्शदीप सिंग ,मोहम्मद सिराज


अमेरिका : अँड्रीस गॉस (यष्टीरक्षक) , सैतेजा मुक्कामल्ला , मोनंक पटेल (कर्णधार) , मिलिंद कुमार , संजय कृष्णमूर्ती , शुभम रांजणे , हरमीत सिंग , मोहम्मद मोहसीन , शॅडली व्हॅन शाल्कविक , अली खान , सौरभ नेत्रावलकर

Comments
Add Comment

Thank You...! भारतीय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला, बीसीसीआयने केलं जाहीर

भारतीय पुरूष क्रिकेट संघाचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ अखेर संपुष्टात आला आहे. अजित आगरकर

भुवनेश्वर कुमारचं भारतीय संघात पुनरागमन, पण आरसीबीला बसणार फटका; लिलावाचं गणित असं बिघडणार!

भारतीय संघ 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंड दौऱ्यात टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने 6

ICC Ranking: वनडेत विराट कोहली फटका आणि शुभमन गिलला झाला फायदा, कसं काय ते समजून घ्या

आयसीसीकडून दर बुधवारी आठवड्याच्या कामगिरीचा आढावा घेऊन क्रमवारी जाहीर करण्यात येते. नुकतीच आयसीसीने वनडे

स्मृती आणि हरमनप्रीत कौर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममध्ये कसं होतं वातावरण? अफवांवर मंधानाने मौन सोडलं

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. एशियन गेम्स 2026 स्पर्धेत सुवर्ण

श्रेयस अय्यरचा महाविक्रम! विंडीजविरुद्ध ऐतिहासिक शतक ठोकत मोडले रोहित अन् विराटचे रेकॉर्ड्स

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर झंझावात पाहायला मिळाला. 

वेस्ट इंडिजला पहिल्या टी20 सामन्यात भारताने लोळवलं, 171 धावांचं आव्हान सहज गाठलं

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौच्या इकाना