ICC Ranking: वनडेत विराट कोहली फटका आणि शुभमन गिलला झाला फायदा, कसं काय ते समजून घ्या

आयसीसीचं वनडे रँकिंग जाहीर झाली असून यात बरीच उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारत वेस्ट इंडिज वनडे मालिकेचा या रँकिंगवर स्पष्ट परिणाम दिसत आहे. चला जाणून घेऊयात काय उलथापालथ झाली ते...

आयसीसीकडून दर बुधवारी आठवड्याच्या कामगिरीचा आढावा घेऊन क्रमवारी जाहीर करण्यात येते. नुकतीच आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली असून त्यात बरीच उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारत वेस्ट इंडिज वनडे मालिकेचा या क्रमवारीवर स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला होता. त्याचा परिणाम त्यांच्या गुणांकनावर झाला आहे. विराट कोहलीची वनडे क्रमावारीत घसरण झाली आहे. मागच्या आठवड्यात विराट कोहली वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होता. पण आता त्याची घसरण झाली असून तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, टी20 क्रमवारीत श्रेयस अय्यरने मोठी झेप घेतली आहे. एशियन गेम्स स्पर्धेतील कामगिरीनंतर त्याला फायदा झाला आहे. त्याने एका झटक्यात 18 खेळाडूंना मागे टाकलं आहे.

शुभमन गिलची सरशी


वनडे क्रमवारीत भारतीय कर्णधार शुभमन गिलचा डंका वाजला आहे. मागच्या आठवड्यात शतकी खेळीनंतर द्विशतकी खेळीही त्याच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे शुभमन गिल 841 रेटिंग पॉइंटसह पहिल्या स्थानावर आहे. तर मागच्या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने एक स्थानाची झेप घेत दुसरं स्थान गाठलं आहे. डॅरिल मिचेलचं रेटिंग पॉइंट हे 794 इतकं आहे. तर विराट कोहलीची दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. विराट कोहली 781 रेटिंग पॉइंटसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर रोहित शर्माची वनडे रँकिंग कायम आहे. रोहित शर्मा 770 रेटिंग पॉइंटसह चौथ्या स्थानावर आहे.

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार, भारताचे चार फलंदाज टॉप 10 मध्ये आहेत. त्यापैकी तीन फलंदाज हे टॉप 5 मध्ये आहेत. तर केएल राहुलची टॉप 10 मध्ये एन्ट्री झाली आहे. केएल राहुल शतकी खेळीनंतर 11व्या स्थानावरून 10व्या स्थानी विराजमान झाला आहे. केएल राहुलचं रेटिंग पॉइंट 653 इतकं आहे.





श्रेयस अय्यरने 18 खेळाडूंना दिली मात


आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये श्रेयस अय्यरने मोठी झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची शतकी खेळी त्याच्या पथ्यावर पडली आहे. श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 43 चेंडूत 102 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला टी20 क्रमवारीत फायदा झाला आहे. श्रेयस अय्यरने 18 खेळाडूंना मागे टाकत 25व्या स्थानावरून थेट सातव्या स्थानी झेप घेतली आहे.
Comments
Add Comment

IND vs NZ, 2nd Test: जसप्रीत बुमराहने सामन्याच्या दरम्यान बदलला रन अप, 11 वर्षापूर्वीच्या स्टाईलमध्ये गोलंदाजी Video

भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू असून पहिल्या दिवसाचा खेळ संपला. न्यूझीलंडने पहिल्या दिवशी 5 गडी

IND vs NZ, 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडच्या 5 बाद 246 धावा

भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना काईस्टचर्च येथे सुरू आहे. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाने जिंकला आणि

WTC मध्ये सर्वाधिक विकेट्स घेऊनही सिराजला बाहेरचा रस्ता; टीम इंडियाचा मोठा डाव?

मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यासाठी क्राइस्टचर्चच्या मैदानावर भारतीय संघ

Asia Cup Rising Stars 2026: भारत ए संघाचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं, श्रीलंकेकडून 8 गडी राखून पराभव

एसीसी आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारताचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. भारताला उपांत्य फेरीत

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये मुंबईची धमाकेदार आगेकूच! 7 सामन्यांत 6 वा विजय; पुदुचेरी-हरियाणाचा थरार

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये मुंबईच्या संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखत उत्तराखंडचा 86 धावांनी धुव्वा

IND vs NZ 2nd Test Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह? जाणून घ्या सर्व माहिती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित ठरला आहे.