स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौरमध्ये वादाचं कारण काय?
स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्यात बिनसल्याचं चर्चांवर कोणीही सहज विश्वास ठेवणार नाही. कारण यापूर्वी अशा बातम्या कधीच समोर आल्या नव्हत्या. पण कर्णधारपद बदलताच या चर्चांना उधाण आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांमधील वादाचं कारणच कर्णधारपद होतं. एका मुलाखतीत मंधानाने सांगितलं होतं की, जर तिला कर्णधारपद मिळालं तर तिच्यासाठी अभिमानाची बाब असेल. तेव्हापासून हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांच्यात बिनसल्याची चर्चा मीडियात आहे. पण या बातम्यांची पुष्टी प्रहार डॉट इन करत नाही. असं असताना स्मृती मंधानाने एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. त्यामुळे या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Amid rift rumours, Smriti Mandhana shared a heartfelt Instagram story for Harmanpreet Kaur. https://t.co/n7r6U8wOOo
— Fan RCBians (@RcbianOfficial) October 7, 2026
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर झंझावात पाहायला मिळाला. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या ...
काय म्हणाली स्मृती मंधाना?
स्मृती मंधानाला कर्णधारपदाची जबाबदारी मिळताच दुसऱ्याच दिवशी तिने हरमनप्रीतबाबत एक पोस्ट केली आहे. तिने हरमनप्रीतच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. इतकंच काय तर एकत्र खेळलेल्या वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. स्मृती मंधाना इंस्टा स्टोरीत म्हणाली की, "इतकी वर्षे तुमच्यासोबत खेळणे हा एक आनंददायी अनुभव होता. तुमच्या नेतृत्वाची दहा वर्षे शानदार होती आणि आपण एकत्र मिळून आपल्या देशासाठी आणखी अनेक गौरव मिळवण्यासाठी प्रयत्न करू."