पुण्याच्या आरुषची गगनभरारी, १० व्या वर्षी अवकाशाला गवसणी

पुणे : हल्लीची मुलं ही मुळातच हुशार असतात. लहानग्या वयातच त्यांचा पंखात असणारं बळ हे प्रचंड असतं. थोडक्यात काय तर जिद्द ही अमाप असते. अश्याच एका मेहनती जिद्दी पुण्याच्या आरुष जोशी याने वयाच्या १० व्या वर्षी अवकाशाला गवसणी घातली आहे.


खेळण्याबागडण्याच्या वयात आरुषने टेलिस्कोपचं खेळणं हातात धरत चक्क दोन लघुग्रहांचा शोध लावला आहे. सध्या पाचवीत असणाऱ्या आरुषने मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असलेल्या दोन छोट्या लघुग्रहांचा शोध लावला.



IASC कडून आरुषच्या संशोधनाला मान्यता


आरुषला लहानपणापासूनच अंतराळाचे आकर्षण होते. जसा मोठा होत गेला तसं अंतराळाविषयीचे त्याचे वाचन वाढत गेले, तो अंतराळाशी संबंधित अधिकाधिक माहिती शोधू लागल. व्हिडीओ बघू लागला. याच सगळ्यातून त्याची कल्पनाशक्ती बहरत गेली. त्याला अंतराळाविषयी सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. सध्या आरुषकडे १५० मिमी व्यासाची टेलिस्कोप असून त्याच्या मदतीने तो चंद्र, सूर्यमालेतील विविध ग्रह तसेच अँड्रोमेडा दीर्घिकेकसारख्या आकाशातील अनेक गोष्टींचे निरीक्षण करतो.



त्याच्या या शोधला मान्यता कशी मिळाली ?


आरुषने अलीकडेच नासा संलग्न इंटरनॅशनल अस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅब्रेशन या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर अंतराळ संशोधनावर चर्चा होते. चर्चेच्या निमित्तानेच आरुषने सहकाऱ्यांसोबत सलग अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ अंतराळ संशोधन केले. संशोधनातून मिळालेल्या माहितीआधारेच लघुग्रहांचा शोध घेतला. मेहनत आणि चिकाटीमुळे त्याला यश मिळाले. आरुषने शोधलेल्या लघुग्रहांना IASC कडून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.


नव्याने शोध झालेल्या या लघुग्रहांचा तातपुरत्या शोधाच्या वर्गात समावेश हा मायनर प्लॅनेट सेंटरकडून करण्यात आला आहे. सध्या हे लघुग्रह प्रोव्हिजनल डिस्कव्हरी म्हणेजच तात्पुरत्या शोधाच्या वर्गात समाविष्ट आहेत.


आता पुढील काही वर्षे या लघुग्रहांचे बारकाईने निरीक्षण केले जाणार आहे. सूर्याभोवती फिरण्याची कक्षा निश्चित झाल्यांनतर आरुषला या लघुग्रहांना कायमस्वरूपी नावे देण्याचा मान मिळणार आहे. एवढ्या लहान वयात केलेल्या आरुषच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि