सूर्यकुमारने टी ट्वेंटी विश्वचषकात केला मोठा विक्रम

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात २० षटकांत नऊ बाद १६१ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने शून्य, ईशान किशनने २०, तिलक वर्माने २५, सूर्यकुमार यादवने नाबाद ८४, शिवम दुबेने शून्य, रिंकू सिंगने ६, हार्दिक पांड्याने ५, अक्षर पटेलने १४, अर्शदीप सिंहने ४, वरुण चक्रवर्तीने नाबाद शून्य धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत चार षटकार आणि दहा चौकार मारत नाबाद ८४ धावा केल्या. सूर्याच्या झंझावातामुळेच भारताचे बाकीचे फलंदाज मोठी कामगिरी करू शकले नाही तरी भारतीय संघाने १५० धावांचा टप्पा पार केला.


सूर्यकुमारने अमेरिकेविरुद्ध खेळताना ३६ चेंडूत अर्धशतक केले. त्याने टी ट्वेंटी क्रिकेटमधले २५ वे अर्धशतक केले. या खेळीमुळे सूर्यकुमार यादव टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. सूर्यकुमारने आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषकात १९ सामन्यांत ५६४ धावा आहेत.


आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू




  1. विराट कोहली - १२९२ धावा

  2. रोहित शर्मा - १२२० धावा

  3. युवराज सिंग - ५९३ धावा

  4. सूर्यकुमार यादव - ५६४ धावा (कारकिर्द सुरू आहे)

  5. महेंद्रसिंह धोनी - ५२९ धावा

  6. गौतम गंभीर - ५२४ धावा

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम