T20 World Cup 2026 PAK vs NED: बाबर आझम पुन्हा फ्लॉप...;पहिल्याच सामन्यात पाकचा रडतखडत विजय

श्रीलंका: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात कोलंबोमध्ये खेळला गेला. पाकिस्तानने हा सामना तीन विकेट्सने जिंकला असला तरी, पण नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.


शनिवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम पुन्हा एकदा अपयशी ठरला. कर्णधार सलमान अली आगाचा खेळ देखील फारसा चालला नसल्याने पहिल्याच सामन्यात पाकचा रडतखडत विजय झाला आहे.







बाबर आझम पुन्हा फ्लॉप...


टी २० विश्वचषकाच्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात, पाकिस्तानचा फलंदाज स्टार बाबर आझमने ८३.३३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. बाबर आझम पुन्हा एकदा फ्लॉप ठरला, त्याने १८ चेंडूत केवळ १५ धावा केल्या. तसेच उस्मान खान शून्यावर बाद झाला, तर सॅमही चुकीचा फटका मारून पॅव्हेलियनमध्ये परतला. फलंदाजीत साहिबजादा फरहानने पाकिस्तानकडून सर्वाधिक ४७ धावांची झुंज दिली, तर सॅम अयूबने २४ धावा केल्या. मात्र पाकिस्तानची मधली फळी पूर्णपणे कोलमडली. एकवेळ पाकिस्तानचा स्कोअर ९८/३ असा असताना तो झपाट्याने १००/५ झाला आणि सामना नेदरलँड्सच्या बाजूने झुकला. शादाब खान (८), मोहम्मद नवाज (६) आणि आघा सलमान (१२) देखील अपयशी ठरले.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम