काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा


मुंबई : “काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन झाले आहे आणि आजही त्यांनी आपल्या धोरणात बदल केलेला नाही. तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात लांगुलचालनाचे काम तेथील सरकारकडून सुरू आहे. या देशात जेव्हा जेव्हा तुष्टीकरणाचे, लांगुलचालन करण्याचे राजकारण झाले, त्या-त्या वेळी देशाला त्याचे नुकसान भोगावे लागले आहे. तरी देखील काँग्रेस पक्ष मतदानाकरता लांगुलचालन करण्याचा प्रयत्न करत आहे”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.


तेलंगणमधील नगरपालिका निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत ते बोलत होत. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी मुस्लिमांना दिलेल्या चार टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा खरपूस समाचार घेत, कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन झाले. ते आजही तुष्टीकरण करत आहेत. मात्र, आता लोक त्यांना साथ देणार नाहीत. मनुष्य कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, न्याय सर्वांसाठी समान आहे. मात्र, मतांसाठी सुरू असलेले तुष्टीकरण स्वीकार्य नाही”,



गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा


गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी मोहिमेत सी-६० जवानांनी सात जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या ऑपरेशनमुळे जिल्ह्यातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जवानांचे कौतुक करत अभिनंदन केले. फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीत नक्षलवाद्यांची एकच कंपनी शिल्लक होती, आणि त्या कंपनीतील प्रमुख सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे ऑपरेशन दुर्गम आणि घनदाट जंगलात पार पाडण्यात आले, आणि तीन दिवस सलग पोलिसांनी रणनीती आखून दोन बाजूंनी घेरा घालून नक्षलवाद्यांना अडवले. या चकमकीत नक्षल संघटनेचा महत्त्वाचा नेता प्रभाकर याचा खात्मा झाला. प्रभाकर कंपनी क्रमांक-१० चा प्रभारी असून, गडचिरोली विभागीय कमिटी आणि वेस्ट सब-झोनल ब्युरोचा प्रमुख होता. त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले गेले होते. मोहिमेत पोलिसांनी संयम, धैर्य आणि अचूक नियोजन यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवली, तरीही एक पोलीस जवान शहीद झाला. शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.