बाबा वेंगाच्या भाकितांमुळे पुन्हा चर्चेत; सोने-चांदीच्या किमतींबाबत दिले कोणते संकेत?

बल्गेरिया : भाकितांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बल्गेरियन द्रष्ट्या बाबा वेंगा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. भूतकाळातील काही घटनांशी त्यांच्या कथित भविष्यवाण्यांची सांगड घातली जात असल्याने, आजही अनेक जण त्यांच्या भाकितांकडे उत्सुकतेने पाहतात. सध्या वाढत्या सोने आणि चांदीच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगांच्या एका जुन्या भाकितांचा पुन्हा उल्लेख केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये करण्यात आलेल्या एका कथित भविष्यवाणीत जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे सोने, चांदी आणि तांबे यांसारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक वाढू शकते, असा संकेत देण्यात आला होता. या अस्थिरतेचा परिणाम कागदी चलनांच्या विश्वासार्हतेवर होईल आणि लोक सुरक्षित पर्यायांकडे वळतील, असा दावा या भाकितांमध्ये करण्यात आला आहे.



चलनांवरील विश्वास कमी होण्याचा दावा


या भाकितांनुसार, डॉलर, रुपया, येन, युआन यांसारख्या कागदी चलनांचे मूल्य कमी होऊ शकते. त्यामुळे नोटांवरील विश्वास कमी होऊन लोक सोने, चांदीसारख्या मौल्यवान धातूंना सुरक्षित गुंतवणूक मानतील, असा दावा केला जातो. परिणामी, या धातूंच्या मागणीत वाढ होऊ शकते.



भविष्यवाणी विरुद्ध तज्ज्ञांचे मत


दरम्यान, आर्थिक तज्ज्ञ आणि बाजार विश्लेषक या दाव्यांकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या काळात सोने आणि चांदीच्या किमती वाढण्यामागे जागतिक, राजकीय तणाव, महागाईची भीती, डॉलरमधील चढउतार आणि औद्योगिक मागणी ही प्रमुख कारणे आहेत. या वाढीचा थेट संबंध कोणत्याही भविष्यवाणीशी जोडता येत नाही


काही बाजार विश्लेषकांच्या अंदाजानुसार, चालू वर्षाच्या अखेरीस सोने नवीन उच्चांक गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर औद्योगिक वापरामुळे तांब्याची मागणीही मजबूत राहू शकते.


बाबा वेंगाचं भाकितं चर्चेचा विषय ठरत असला , तरी गुंतवणुकीचे निर्णय केवळ अशा दाव्यांवर आधारित न करता आर्थिक परिस्थिती, बाजारातील ट्रेंड आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचा विचार करूनच घ्यावेत, असं अर्थतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे