Mumbai: परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली मोठी फसवणूक, आरोपी फरार

मुंबई : मुंबईत परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. चारकोप परिसरातील करिअर अँड ऑप्शन्स सर्व्हिस लिमिटेड या एजन्सीविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजन्सीचे मालक स्टेला मेहता आणि राकेश मेहता हे मुख्य आरोपी आहेत.


मुंबईत परदेशात उच्च शिक्षण देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आणि पालकांंची कोट्यवधी रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात प्रथम हा प्रकार समोर आला तेव्हा १३ तक्रारदार पुढे आले होते. पण तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे नवीन पीडित समोर येऊ लागले आणि आता तक्रारदारांची संख्या १८ वर पोहोचली आहे. सुरुवातीला सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज होता, परंतु नव्या तक्रारींमुळे हा आकडा तब्बल २ कोटी ८७ लाख ५४ हजार २५३ रुपये इतका वाढला आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दाम्पत्य विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी प्रवेश, व्हिसा प्रक्रिया, विद्यापीठात सीट कन्फर्मेशन आणि निवासाची सोय करून देण्याचं आमिष दाखवत मोठ्या रकमा घेत होते. परंतु पैसे घेतल्यानंतर ना प्रवेश मिळाला ना व्हिसा प्रक्रिया पूर्ण झाली. काहींना बनावट कागदपत्रे देण्यात आल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा फटका केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून नाशिकमधील एका विद्यार्थ्यालाही या एजन्सीने गंडा घातल्याचं तपासात समोर आलं आहे.


या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. निधी दवे नावाच्या विद्यार्थिनीबाबतही असाच प्रकार घडला असून, या फसवणुकीच्या मानसिक तणावामुळे तिच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती तक्रारदारांकडून देण्यात आली आहे. प्रकरणाचा एकत्रित विचार केला असता, परदेशी शिक्षणाच्या नावाखाली जवळपास ३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच स्टेला मेहता आणि राकेश मेहता फरार झाले असून त्यांनी ओडिशाला पळ काढल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून आर्थिक व्यवहारांची साखळी, बँक खात्यांची माहिती आणि परदेशी विद्यापीठांशी असलेला संपर्क याचा तपास सुरू आहे.


कुणाची किती रुपयांची फसवणूक?


तक्रारदार १ – १०,००,००० रु


तक्रारदार २ – ११ ,००,००० रु


तक्रारदार ३ – १७,५०,००० ररु


तक्रारदार ४ – १४,८२,००० रु


तक्रारदार ५ – २०,९४,००० रु


तक्रारदार ६ –४,६०, ,००० रु


तक्रारदार ७ – ९,००,००० रु


तक्रारदार ८ – १६,९१,००० रु


तक्रारदार ९ – २,७५,००० रु


तक्रारदार १० – १३,००,००० रु


तक्रारदार ११ – ३,२०,००० रु


तक्रारदार १२ – १८,८५,४९२ रु


तक्रारदार १३ – २२,००,००० रु


तक्रारदार १४ – ३,८५,००० रु


तक्रारदार १५ – ३८,६७,९९६रु


तक्रारदार १६ – ३९,९७,९१८रु


तक्रारदार १८ – १८,२४,६९३रु


तक्रारदार १८– २२,२१,१५४रु


 

तक्रारदारांनी मोठ्या आशेने मुलांच्या शिक्षणासाठी जमा केलेली बचत या फसवणुकीत गमावल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पालकांकडून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :