Ameet Satam: मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी फुंकला शंख


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


"४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेत विराजमान होणार असून येणाऱ्या काळात मुंबई शहराला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याच्या हेतूने, मुंबई शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या, तसेच शहराची सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून मुंबईच्या महापौर कार्यरत असतील. महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल, असे सांगत महापालिकेत शंख फुंकत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम महापालिका भ्रष्टाचारमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला.


महायुतीच्यावतीने महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी मुंबई महापालिका भाजप पक्ष कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासह महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे, भाजपचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार मनोज कोटक, गटनेते गणेश खणकर, भाजप सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्वेता परुळकर आदी उपस्थित होते.


मुंबईकरांचं जीवन सुकर करणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर आणि उपमहापौर हे कार्य करतील,असे स्पष्ट केले.


उबाठा आणि मनसे यांच्याकडून उमेदवारीची शक्यता असल्याने याचं आव्हान वाटतं का या प्रश्नावर उत्तर देताना साटम म्हणाले की, "सर्वांनाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं स्वातंत्र्य असते. त्यामुळे ज्यांना अर्ज दाखल करायचे आहेत ते सर्वच उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात. पण भाजपा आणि शिवसेना यांचे ११८ नगरसेवक आणि नगरसेविका आहेत आणि त्या ११८ व्यतिरिक्त आणखी काही नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेलं आहे."



एमआयएमचे अजिबात स्वागत नाही


मुंबईला भ्रष्टाचाराला बाहेर काढण्यासाठी तसेच मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी जे जे लोक महायुतीला पाठिंबा देवू इच्छितात त्यांचे स्वागत असेल. ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली मुंबई शहर भ्रष्टाचारमुक्त करून शहराचा विकास करायचा आहे. त्या सर्व हिंदूत्ववादी शक्तींचे आम्ही स्वागत करतो,असे साटम यांनी सांगत मनसेसोबत कोणी आल्यास त्यांना सोबत घेतले जाईल असे स्पष्ट केले.


यासोबत एमआयएमच्या नगरसेवकांना सोबत घेऊन जाणार का या प्रश्नाचं उत्तर देताना, साटम म्हणाले की "मी अजिबात त्यांचं स्वागत करणार नाही. आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. समाजविरोधी, समाजविघातक, देशविरोधी वृत्तींच्या शक्तींशी सहानुभूती ठेवणाऱ्यांशी आम्ही नेहमीच संघर्ष केलेला आहे आणि तो कायम राहील." असंही त्यांनी स्पष्ट केलं.



महापालिकेतील भ्रष्टाचाराला मातृशक्ती कायमची उखडून फेकणार...


"मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच असेल ही सुरुवातीलाच सांगितलेले होते. कदाचित विरोधकांना त्यांचा महापौर दुसराच कोणीतरी करायचा होता, मात्र महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकला असून त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी उधळून लावलेलं आहे. आणि मुंबईकरांना, हिंदू, मराठी, कोकणी-मालवणी महापौर लाभलेला आहे. मातृशक्तीचं नेतृत्व मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेले असून मला पूर्ण विश्वास आहे आई जगदंबेसारखे भ्रष्टाचाराला कायमचे, ज्या भ्रष्टाचाराला उध्दव ठाकरेंच्या पक्षाने या महापालिकेत जन्म दिला होता,त्या भ्रष्टाचाराला आई जगदंबेच्या आशिर्वार्दान मातृशक्ती कायमची उखडून फेकून देईल,असे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.