नवख्या वाटणाऱ्या संघांनी अनुभवी संघांना रडवले

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने झाले असून सहावा श्रीलंका विरुद्ध आयर्लंड हा सामना सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांचे निकाल बघितले तर नवख्या वाटणाऱ्या संघांनी अनुभवी संघांना रडवले असेच म्हणावे लागेल.


नेदरलँड आणि पाकिस्तान यांच्यात झालेला सामना शेवटच्या म्हणजेच विसाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूपर्यंत रंगला. हा सामना पाकिस्तानने तीन विकेट राखून जिंकला. पण या सामन्यात नेदरलँडने १९.५ षटकांत सर्वबाद १४७ तर पाकिस्तानने १९.३ षटकांत ७ बाद १४८ धावा केल्या.


अमेरिका आणि भारत यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने २० षटकांत ९ बाद १६१ धावा केल्या. अमेरिकेने २० षटकांत आठ बाद १३२ धावा केल्या. अमेरिकेच्या फलंदाजांनी सुरुवातीला चौफेर फटकेबाजी केली. अमेरिकेसारख्या भारताच्या तुलनेत नवख्या असलेल्या संघाने खूप चांगली कामगिरी केली. यामुळे २९ धावांनी विजय मिळाला तरी सामन्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत भारतीय संघ दबावात होता, असेच मत अनेक क्रिकेटतज्ज्ञांनी व्यक्त केले.


रविवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्धचा सामना न्यूझीलंडने पाच विकेट राखून जिंकला. पण इंग्लंडची नेपाळविरुद्ध जिंकताना पुरती दमछाक झाली. इंग्लंडने २० षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या तर नेपाळने २० षटकांत ६ बाद १८० धावा केल्या. अखेर इंग्लंडने नेपाळ विरुद्धचा सामना चार धावांनी जिंकला.



आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक २०२६



  1. नेदरलँड्स १४७ (१९.५) आणि पाकिस्तान १४८-७ (१९.३) - पाकिस्तान ३ विकेटनी जिंकला

  2. वेस्ट इंडीज १८२-५ (२०) आणि स्कॉटलंड १४७ (१८.५) - वेस्ट इंडिज ३५ धावांनी जिंकला

  3. भारत १६१-९ (२०) आणि अमेरिका १३२-८ (२०) - भारत २९ धावांनी जिंकला

  4. अफगाणिस्तान १८२-६ (२०) आणि न्यूझीलंड १८३-५ (१७.५) - न्यूझीलंड ५ विकेटनी जिंकला

  5. इंग्लंड १८४-७ (२०) आणि नेपाळ १८०-६ (२०) - इंग्लंड ४ धावांनी जिंकला

Comments
Add Comment

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव